Pune Crime Sakal
पुणे

Pune Crime : भांडणं सोडवण्यासाठी मधे आला म्हणून सराईत गुन्हेगारांकडून तरुणावर जिवघेणा हल्ला

त्यावेळी ते गुन्हेगार तेथून निघून गेले व काही वेळानंतर पुन्हा दहा ते पंधरा गुन्हेगारांना घेऊन आले.

निलेश बोरुडे

Pune Crime - आमच्या भांडणात तु का आला असे म्हणत सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी येथील तरुणावर दहा ते पंधरा सराईत गुन्हेगारांच्या टोळीने भर दिवसा मेडीकल दुकानात घुसून जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून हवेली पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिंहगड रस्त्याला लागून किरकटवाडी फाट्यालगत काही सराईत गुन्हेगार दुसऱ्या एका तरुणाला मारहाण करत होते. त्यावेळी किरकटवाडी येथील स्थानिक तरुणाने मधे जाऊन तरुणाची सुटका केली.

त्यावेळी ते गुन्हेगार तेथून निघून गेले व काही वेळानंतर पुन्हा दहा ते पंधरा गुन्हेगारांना घेऊन आले. किरकटवाडी येथील तरुण मेडिकल दुकानाच्या काऊंटर जवळ थांबलेला होता. त्यावेळी गुन्हेगारांनी त्याला लाथाबुक्क्यांनी व मोठमोठे दगड डोक्यात घालून बेदम मारहाण केली.

शिवीगाळ व हाणामारीचा आवाज ऐकून इतर नागरिक धावत आले परंतु संबंधित गुन्हेगार मोठमोठ्याने शिवीगाळ करत दिसेल त्याला दगड मारत दहशत निर्माण करत होते. भर रस्त्यावर हा प्रकार सुरू असल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.

तसेच वाहतूकही थांबली होती. सर्वांना धमकावत ते गुन्हेगार निघून गेल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या तरुणाला जवळील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी पाच ते सहा गुन्हेगारांना अटक केली आहे. याबाबत हवेली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आयपीएस अनमोल मित्तल अधिक तपास करत आहेत.

कडक कारवाई करण्याची मागणी. सराईत गुन्हेगार भर दिवसा येऊन मारहाण करून दहशत निर्माण करत असल्याने नागरिक व व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे अशा गुन्हेगारी टोळ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिक व व्यावसायिक करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शिंदेंसेनेच्या नेत्याचा रुग्णालयात राडा! बिलावरून वाद, कर्मचाऱ्याला शिवीगाळ अन् मारहाण करत...; पालघरमध्ये काय घडलं?

महाराष्ट्राच्या मंत्र्यांसमोरच संजय दत्तने मराठी बोलण्यास नकार दिला; म्हणाला, ‘६ वर्षे जेलमध्ये राहिलो, तरी... ’

Marathi News Live Updates : आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा - आमदार गोपीचंद पडळकर

भंडारा डोंगरावर एकटी सापडली दीड वर्षांची चिमुकली, पोलिसांकडून आई-वडिलांचा शोध सुरू; मदतीचे आवाहन

Tukaram Mundhe: उत्सवांवर निर्बंध नाहीत, पण अन्नात भेसळ नकोच! तुकाराम मुंढेंचं FDAच्या आदेशावर स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT