crime esakal
पुणे

Pune Crime: पुणे महिलांसाठी सुरक्षित नाहीच? सात महिन्यात तब्बल 'इतक्या' बलात्काराच्या घटना

Pune Crime rate: महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचे माहेरघर असा लौकिक पुण्याचा आहे. पण, काही महिन्यांपासून पुण्यात धक्कादायक घटना घडत आहे.

कार्तिक पुजारी

Pune Crime News: पुण्यामध्ये महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दररोज काही प्रकरणे समोर येत आहेत. याच प्रकरणी पुण्यातील महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांची आकडेवारी समोर आली आहे. पुण्यात सात महिन्यात 265 बलात्काराच्या घटना तर 450 विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले आहेत. 'साम टीव्ही'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचे माहेरघर असा लौकिक पुण्याचा आहे. पण, काही महिन्यांपासून पुण्यात धक्कादायक घटना घडत आहे. दररोज काही घटना कानावर पडत आहेत. पुणे गुन्हेगारी सिटी होत आहे का? असा प्रश्न लोक विचारू लागले आहेत. पुण्यात या वर्षातील फेब्रुवारी पासून सात महिन्यात 265 बलात्काराच्या आणि 450 विनयभंगाची गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

महिला व मुला मुलींच्या सुरक्षेतेसाठी पुणे पोलिसांकडून दामिनी पथक,पोलीस काका,पोलीस दीदी आधी उपक्रम राबवले जात आहेत.तरीही दर महिन्याला बलात्काराच्या सरासरी 38 तर विनयभंगाचे 65 गुन्ह्याची पोलिसांकडून नोंद आहे. ही धक्कादायक आणि चिंता वाढवणारी आकडेवारी आहे. त्यामुळे पुणे सुरक्षित आहे का असा प्रश्न निर्माण होतो आहे.

पुण्यातील अत्याचाराच्या घटना

महिना बलात्कार विनयभंग

ऑगस्ट ३७ ६०

जुलै ३९ ४४

जून. ३५ ६२

मे ३७ ६५

एप्रिल ३६ ६६

मार्च ३९ ८५

फेब्रुवारी ४२ ६८

एकूण २६५ ४५०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly election results 2026 Live Update: बारामतीत करुणा मुंडे -बिचुकलेंना किती मते मिळाली? नोटाला किती?

Infrastructure Success: ऋतुजा नागटिळक-ढोक ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पात चमकली; जगातील लांब बोगदा प्रकल्पात महत्त्वाची भूमिका, बहुराष्ट्रीय कंपनीत मॅनेजर!

Chhatrapati Sambhajinagar: अफवांमुळे गॅस बुकिंगसाठी ग्राहकांची ऑनलाइन झुंबड;सोशल मीडियावर फिरताहेत दरवाढीचे मेसेज

IPL 2026: हार्दिक, सूर्यकुमारच्या फॉर्मवर लक्ष; मुंबई लखनौमध्ये आज लढत, तळाच्या संघांमध्ये झुंज, पाहा कशी असेल Playing XI

PAN Rule: आता या कामांसाठी PAN कार्ड बंधनकारक! Form 60 बंद, Form 97 लागू; जाणून घ्या पॅनचे नवे नियम

SCROLL FOR NEXT