पुणे

Pune Crime: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरण! संस्थेच्या विश्वस्तांसह प्राचार्यांवर आमदार धंगेकरांचे गंभीर आरोप

सकाळ वृत्तसेवा

पुणे, ता. २७ : कोरेगाव पार्क परिसरातील एका महाविद्यालयातील अल्पवयीन मुलीवर चौघांनी लैंगिक अत्याचार करून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याची घटना नुकतीच समोर आली. हे प्रकरण संस्थेच्या विश्वस्तासह प्राचार्यांनी दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करीत सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे केली आहे.

या संदर्भात आमदार धंगेकर यांनी शुक्रवारी (ता. २७) पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांना निवेदन दिले. या महाविद्यालयातील अल्पवयीन मुलीवर चार मुलांनी लैंगिक अत्याचार केला. त्यांनी या घटनेचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर प्रसारित केला. अन्य एका मुलीमुळे दहा दिवसांपूर्वी ही घटना उघडकीस आली. त्यानंतर समुपदेशिकेने हा प्रकार विश्वस्त आणि प्राचार्यांना सांगितला. परंतु त्यांनी दखल घेतली नाही. पीडित मुलीचे वडील याच महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. त्यांनी विश्वस्त आणि प्राचार्यांना भेटून कारवाई करण्याची मागणी केली. परंतु उलट त्यांनी मुलीच्या वडिलांना दमदाटी केली. तसेच, कोठे वाच्यता केल्यास संस्थेकडून कारवाई करण्याची धमकीही दिल्याचे समजते, असे धंगेकर यांनी निवेदनात म्हटले आहे.

पोलिसांत तक्रार का दिली नाही?

अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचे प्रकरण समोर आल्यानंतर संस्था आणि महाविद्यालयाकडून पोलिस ठाण्यात लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण (पॉस्को) कायद्यान्वये तक्रार देणे अपेक्षित होते. परंतु त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप धंगेकर यांनी केला आहे.

आरोपींमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्याचा मुलगा?

आरोपींपैकी काहीजण धनदांडग्यांची मुले असून, एकजण वरिष्ठ अधिकाऱ्याचा मुलगा असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे त्या विश्वस्ताकडून पीडित मुलीच्या वडिलांवर दबाव आणला जात असल्याची चर्चा आहे.

विश्वस्ताचे मंत्र्याशी संबंध ?

संस्थेच्या या विश्वस्ताचे एका मंत्र्याशी संबंध आहेत. त्या मंत्र्याचे नाव घेत महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप धंगेकर यांनी निवेदनाद्वारे केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT