crime esakal
पुणे

Pune Crime: पुणे हादरलं! नशा करणाऱ्यांना हटकल्याने कोयत्याने वार करत एकाची हत्या

ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi)

पुणे, ता. ३० : घर व गोठ्याजवळ नशा करत बसलेल्या टोळक्याला हटकल्याचा राग आल्याने टोळक्याने एकावर कोयत्याने वार करून त्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ही घटना रविवारी दुपारी साडे तीन वाजता केशवनगर येथे घडली.

दरम्यान, रात्री उशिरापर्यंत मुंढवा पोलिसांनी आरोपींना अटक केली नव्हती. रवींद्र गायकवाड (वय ५९, रा. केशवनगर, मुंढवा) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

गायकवाड यांचे केशवनगर येथील श्रीकृपा सोसायटीत घर आहे. तेथेच गाई - म्हशींचा गोठा आहे. रविवारी गायकवाड यांच्या गोठ्याजवळ काही तरुण अंमली पदार्थाची नशा करीत बसले होते. त्यावेळी गायकवाड यांनी त्यांना हटकले असता, त्याचा राग आल्याने टोळक्याने त्यांना मारहाण करून पळ काढला.

काही वेळाने पुन्हा या तरुणांनी हातात कोयते घेऊन येत गायकवाड त्यांच्यावर वार केले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या गायकवाड यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, खूनसारख्या गंभीर घटनेनंतर ही पोलिसांकडून अधिकृत माहिती देण्याचा प्रयत्न झाला नाही. याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे यांना संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrakant Patil : 'शरद पवार गट सोबत आला तर विचार करू'; चंद्रकांत पाटलांचे मोठे विधान, काँग्रेसला डावलून 'महायुती'चा सत्तेसाठी नवा फॉर्म्युला!

Earth : पृथ्वीच्या खाली आहे अदृश्य ढाल; जी सगळ्या संकटांपासून आपल्याला ठेवते दूर, नव्या संशोधनातून रहस्यमय खुलासा, पाहा सविस्तर

Viral Video: पहिल्यांदाच ब्लिंकिटवर ऑर्डर! काकूंची प्रतिक्रिया पाहून नेटकरी झाले फिदा, व्हिडिओ व्हायरल

Kolhapur crime news : इचलकरंजी पोलिसांनी घरफोड्या उघडकीस आणल्या पण एसपींनी पोलिसांचीच चौकशी लावली

Russia–US New START Expiry Explained: भयानक इशारा! रशिया–अमेरिका अणु करार संपला, जग पुन्हा न्यूक्लिअर धोक्याच्या उंबरठ्यावर

SCROLL FOR NEXT