Crime News esakal
पुणे

Pune Crime : कोयते घेऊन दहशत माजविण्याचा प्रकार सुरूच; पाच जणांना अटक

कोयता गँगमधील गुन्हेगारांना पोलिसांनी बेदम चोप दिल्याच्या घटनेनंतर शहरात पुन्हा कोयते हातात घेऊन दहशत माजविण्याचा प्रकार सुरूच आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोयता गँगमधील गुन्हेगारांना पोलिसांनी बेदम चोप दिल्याच्या घटनेनंतर शहरात पुन्हा कोयते हातात घेऊन दहशत माजविण्याचा प्रकार सुरूच आहे. दुचाकीवर आलेल्या गुन्हेगारांनी कोयते हवेत फिरवत नागरिकांमध्ये दहशत माजविण्याची घटना नाना पेठेत घडली. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

या संदर्भात पोलिस ठाणे अंमलदार हेमंत पेरणे यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून समर्थ पोलिस ठाण्यात दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गगनदीप अमरिकसिंग मिशन (वय १९), अमन युसूफ खान (वय २२, दोघे रा. नाना पेठ), अरसलन हनीफ तांबोळी (वय २७), मंगेश कैलास चव्हाण (वय २४) आणि गणेश प्रकाश पवार (वय २७, तिघे रा. रविवार पेठ) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. तर, अन्य पाचजण फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक जानेवारीला पहाटे दोन गटांमध्ये भांडणे झाली होती. त्याचा राग मनात धरून सकाळी सहाच्या सुमारास नाना पेठ परिसरात दहाजण दुचाकींवर आले. त्यांनी कोयते हवेत फिरवून नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास करून पाचजणांना अटक केली. न्यायालयाने त्यांना मंगळवारी तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या आरोपींचा कोयता गॅंगशी संबंध नसल्याचे पोलिसांनी सांगितले. वरिष्ठ निरीक्षक रमेश साठे आणि उपनिरीक्षक सौरभ माने पुढील तपास करीत आहेत.

गुन्हेगारांची गय नाही

कोणत्याही गुन्हेगारांची गय केली जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. गुन्हेगारांच्या दहशतीमुळे नागरिकांनी न घाबरता पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिस आयुक्त रितेश कुमार आणि सह आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT