Pune Crime News esakal
पुणे

Pune Crime News: जबरी चोरी करणाऱ्या दोघांना सात वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अपहरण करून लुटणाऱ्या दोघांना न्यायालयाने सात वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येकी ४६ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Pune News - लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अपहरण करून लुटणाऱ्या दोघांना न्यायालयाने सात वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येकी ४६ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी हा आदेश दिला.

ललित दीपक खोल्लम (वय २८) आणि मयूर दिलीप राऊत (वय २१, रा. गहुंजे) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांना जबरी चोरी चारी, अपहरण आणि इतर कलमांनुसार शिक्षा सुनावण्यात आली आहे.

याबाबत चंदन राजकुमार शर्मा (वय २०, रा. आंबेगाव) यांनी सिंहगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. १३ ऑगस्ट २०१५ च्या रात्री पुणे-बंगरुळ महामार्गावर हा प्रकार घडला होता.

फिर्यादी यांना आंबेगावला जायचे असल्याचे ते पुणे-बंगरुळ महामार्गावर पी. के. बिर्याणी हॉटेलजवळ थांबले होते. त्यामुळे दोन्ही आरोपींना त्यांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवले.

त्यानंतर त्यांना बंदूक व चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळील रोख ५० हजार रुपये आणि, दोन मोबाईल असा मिळून ७१ हजार ७०० रुपयांचा ऐवज चोरला. तसेच पोलिसांत तक्रार केल्यास तुझा जीव घेऊ अशी धमकी देवून त्यास चांदणी चौक येथे सोडून निघून गेले.

जाताना त्यांनी फिर्यादी यांच्या डोळ्यांवर मिरची पुडचा स्पे मारला होता. खटल्याचे कामकाज सरकारी वकील नामदेव तरळगट्टी यांनी पाहिले.

तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक शिवदास गायकवाड यांनी या गुन्ह्याचा तपास केला. कोर्ट पैरवी अधिकारी सहायक उपनिरीक्षक संजय जाधव, पोलिस हवालदार पुणेकर, जाधव आणि पोलिस नार्इक गाढवे यांनी कामकाज पाहिले आहे.

खोल्लम आणि राऊत यांनी अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केले आहेत, असे पोलिस तपासादरम्यान उघडकीस आले आहे.

दंडाच्या रकमेतील ५० हजार रुपये फिर्यादी यांना देण्यात यावे. गुन्हेगारांनी दंड भरला नाही तर त्यांना आणखी तीन महिने कारावास भोगावा लागेल, असे निकालात नमूद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : कर्मचारी अन् पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी; आठव्या वेतन आयोगात नेमकं काय ठरणार?, चर्चा निर्णायक टप्प्यात

Nagpur Cyber Fraud: डिलिव्हरी बॉयच्या मुखवट्याआड उभारले ठकबाजांचे साम्राज्य; महिला अटकेत, तिघे फरार; ‘म्युल’ खात्यांच्या रॅकेटचा पर्दाफाश

Sangli Road Accident : ड्यूटी संपली, भूक लागल्याने नाश्ता शोधायला निघाले अन्...; सांगलीत उड्डाणपुलावर भीषण अपघात, कारच्या धडकेत 24 वर्षीय डॉक्टर तरुणीचा दुर्दैवी अंत

Koyna Dam: नवजाला ९१ मिमी पाऊस! कोयना धरणातील पाणीसाठा ९२.७० टीएमसीवर, महाबळेश्वरला उघडीप तर कोयनानगरला पाऊस सुरूच

Sadabhau Khot: 'देशात जगणं स्वस्त, मरणं महाग झालंय': सदाभाऊ खोत, फुकट धान्य आणि अनुदान थांबवा

SCROLL FOR NEXT