crime esakal
पुणे

Pune Crime : पुण्यात तासाभरात तीन महिलांसह चौघांना लुबाडले

पुणे शहरात चोरट्यांकडून मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांना लक्ष्य केले जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहरात चोरट्यांकडून मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांना लक्ष्य केले जात आहे. सहकारनगर, दत्तवाडी, कोंढवा आणि बिबवेवाडी या ठिकाणी सोमवारी केवळ तासाभरात तीन महिलांसह चारजणांच्या सोनसाखळ्या हिसकावून नेल्याच्या घटना घडल्या. पादचारी नागरिकांना लुबाडण्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

चार तोळ्यांचे मंगळसूत्र हिसकावले -

पुणे-सातारा रस्त्यावरील धनकवडी परिसरात शंकर महाराज मठाजवळ पदपथावरून महिला पायी जात होती. दुचाकीवर आलेल्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील चार तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. याबाबत लता राजू धोतले (वय ५१, रा. बालाजीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मंगळसूत्र हिसकावून चोरटे पसार -

कचरा बाहेर टाकण्यासाठी आलेल्या महिलेचे अडीच तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून नेले. त्यानंतर चोरटे दुचाकीवरून पसार झाले. ही घटना पर्वती गावात नंदादीप सोसायटीसमोर सोमवारी घडली. याप्रकरणी मनीषा संदीप शेलार (वय ३३, रा. पर्वतीगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दत्तवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मॉर्निंग वॉक पडले महागात-

मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका महिलेचे साडेचार तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी हिसकावून नेले. त्यात सोन्याचे मंगळसूत्र, लक्ष्मीहार आणि मणी मंगळसूत्र यांचा समावेश आहे. कात्रज-कोंढवा रस्त्यावरील गोकुळनगर परिसरात स्टेट बॅंकेसमोर हा प्रकार घडला. याप्रकरणी सुलोचना अशोक हळंदे (वय ५०, साईनगर, कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार कोंढवा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सोनसाखळी हिसकावून चोरट्यांची ‘धूम’

मॉर्निंग वॉक करून घरी पायी जाणाऱ्या एका व्यक्तीची सोनसाखळी चोरट्यांनी हिसकावून नेली. फिर्यादी वीरेंद्र विश्वास केळकर (वय ५३, महेश सोसायटी, बिबवेवाडी) हे स्वामी विवेकानंद रोडने घरी जात होते. त्यावेळी दुचाकीरून आलेल्या चोरट्यांनी केळकर यांच्या गळ्यातील सुमारे अडीच तोळ्यांची सोनसाखळी हिसका मारून नेली. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सोमवारी सकाळी केवळ तासाभरातील घटना

पोलिस ठाणे घटनास्थळ वेळ

सहकारनगर नेहा फर्निचर दुकानासमोर, धनकवडी ७.४० वा.

दत्तवाडी नंदादीप एज्युकेशन सोसायटीसमोर, पर्वतीगाव ६.४५ वा.

कोंढवा गोकुळनगर, स्टेट बॅंकेसमोर ८ वा.

बिबवेवाडी श्रीधर नीलय सोसायटीसमोर, बिबवेवाडी ७.४० वा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

El Nino Maharashtra Rain : डीप डिप्रेशन वादळी स्थिती; अल् निनोला भेदून महाराष्ट्रात जोरदार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज आला समोर

Student Protest: विद्यार्थी, शेतकरी आंदोलनाची तयारी; ‘सीजेपी’ आणि संयुक्त किसान मोर्चा सरकारविरुद्ध आक्रमक

ब्रेकिंग! मोहोळ तालुक्यातील चिंचोळी ‘एमआयडीसी’त बनावट दारूची फॅक्टरी; कारवाई संपायला लागले १२ तास; ‘एक्साईज’च्या अधीक्षक म्हणाल्या, १५ वर्षांतील सर्वांत मोठी कारवाई

Commonwealth Games 2026: नाशिकच्या दिलीप गावितला 'सुवर्ण'; Goosebumps आणणारा Video! २ रौप्यपदकांसह भारताने सहाव्या दिवशी पक्की केली ६ पदकं

WHO IS DILIP GAVIT? ५ वर्षांचा असताना झाडावरून पडला अन् हात गमावला... शेतमजूराच्या पोरानं राष्ट्रकुल स्पर्धेत 'सुवर्ण'अध्याय लिहिला; संघर्षमय कहाणी

SCROLL FOR NEXT