pune crime update husband killed wife love affair theft cases mobile fraud police sakal
पुणे

Pune Crime : लोहगावमध्ये चाकूने वार करून पत्नीचा खून

पाषाण टेकडीवर फिरण्यासाठी गेलेल्या महाविद्यालयीन तरुणीला धमकावून चोरट्यांनी ५० हजार रुपयांची सोनसाखळी हिसकावून नेली

सकाळ वृत्तसेवा

पुणे : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर चाकूने वार करून तिचा खून केल्याची घटना लोहगावमधील संतनगर परिसरात घडली. रुपाली ऊर्फ बबिता आशिष भोसले (वय ३५, रा. संतनगर, लोहगाव) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी पती आशिष सुनील भोसले (वय ३२) याला अटक केली आहे.

ते दोघे संतनगर परिसरात भाडेतत्त्वावर खोली घेऊन राहत होते. आरोपी आशिष सफाई कामगार असून, त्यांच्यात वाद सुरू होता. त्याने शनिवारी रात्री चाकूने रूपालीच्या गळ्यावर, पोटावर आणि मानेवर वार केले. त्यात गंभीर जखमी झाल्यामुळे रुपालीला रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.

डोक्यात सळई पडून मजुराचा मृत्यू

डोक्यात सळई पडून बांधकाम मजुराचा मृत्यू झाल्याची घटना हडपसर येथील मांजरी बुद्रूक परिसरात घडली. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात बांधकाम ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.विठ्ठल गडदे (वय २९, रा. शेवाळवाडी, हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्या मजुराचे नाव आहे.

या प्रकरणी ठेकेदार अशोक किसन शिंदे (वय ५५, रा. काळेपडळ, हडपसर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत वर्षा बडदे (वय २९) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मांजरी बुद्रूक परिसरात गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. २८ ऑगस्ट रोजी दुपारी चौथ्या मजल्यावरील सळई बांधकाम मजूर गडदे याच्या डोक्यात पडली. त्यामुळे गंभीर दुखापत झाल्याने गडदे याचा मृत्यू झाला. ठेकेदाराने गडदेला हेल्मेट आणि सुरक्षाविषयक साधने पुरवली नसल्याचे तपासात समोर आले.

स्वस्तात मोबाइलच्या आमिषाने हवालदाराची फसवणूक

दीड लाख रुपये किमतीचा मोबाईल स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून एकाने पोलिस हवालदाराची एक लाख रुपयांची फसवणूक केली. याबाबत पोलिस हवालदार सूरज सुभाष शेडगे (वय ४०, रा. स्वारगेट पोलिस वसाहत) यांनी पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून गणेश तुकाराम सुतार (रा. जनता वसाहत, पर्वती) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पाषाण टेकडीवर तरुणीची सोनसाखळी हिसकावली

पाषाण टेकडीवर फिरण्यासाठी गेलेल्या महाविद्यालयीन तरुणीला धमकावून चोरट्यांनी ५० हजार रुपयांची सोनसाखळी हिसकावून नेल्याची घटना रविवारी दुपारी घडली. याबाबत पाषाण येथील एका २२ वर्षीय युवतीने चतु:शृंगी

पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणी तिच्या मित्र-मैत्रिणींसमवेत सूस रस्त्यावरील पाषाण टेकडीवर फिरण्यासाठी गेली होती. त्यावेळी चोरट्यांनी तरुणीच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT