rape  sakal
पुणे

Pune Crime : 'तुझ्या मुलाला जीवे मारून टाकेल व बदनामी करेल' असे बोलून विधवेवर वारंवार बलात्कार; सामाजिक कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

सामाजिक कार्यकत्याशी संपर्क येत असताना ती आरोपीच्या संपर्कात आली. प्रेम असल्याचे सांगून, लग्न करणार असे सांगून बलात्कार केला.

सकाळ वृत्तसेवा

धायरी - प्रल्हाद रामदास तांदळे (वय- ३७, कवडे हॉस्पीटल समोर उत्तमनगर) याच्यावर बलात्काराच्या आरोपाखाली सिंहगड रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तांदळे हा रचनात्मक सेवा संस्थेचा अध्यक्ष आहे. त्याच्या विरोधात ३७ वर्षीय महिलेने फिर्याद केली आहे.

ती विधवा असून सामाजिक कार्यकत्याशी संपर्क येत असताना आरोपीच्या संपर्कात आली. प्रेम असल्याचे सांगून लग्न करणार असे सांगून गेल्या वर्षी एप्रिल पासून त्याने वेगवेगळ्या ठिकाणी लाॅजवर नेऊन बलात्कार केला. तिच्या घरी राहण्यास येऊन धमकी देऊन अनेकदा बलात्कार करत असल्याने पीडितेने पोलिसांना सांगितले.

'तुझ्या मुलाला जीवे मारून टाकेल व बदनामी करेल' असे बोलून विधवेवर वारंवार बलात्कार केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी तांदळे याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : भारतीय वायुसेनेतील जवानांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश; पूर्वपरवानगीशिवाय सेवा सोडता येणार नाही

Koyna Reservoir Renamed : आता कोयना धरण 'छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर' नावाने ओळखले जाणार; शासनाचा ऐतिहासिक निर्णय, पाहा काय आहे GR?

Malin Landslide: माळीण दुर्घटनेला १२ वर्षे! १५१ जणांना गिळणाऱ्या काळरात्रीची वेदना आजही कायम, दरडीत गाडले गेले संपूर्ण गाव

Accident News : भाजपच्या बड्या नेत्याचा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, इनोव्हा कार ट्रकला धडकली अन् ...

ED Raid Coal Mafia : देशातील मोठ्या कोळसा माफियावर ईडीची छापेमारी; ६०० कोटींची मालमत्ता, १६० कोटींचा म्युच्युअल फंड गोठवला

SCROLL FOR NEXT