crime esakal
पुणे

Pune Crime : भांडणात मध्यस्ती करणाऱ्या तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार

भांडणात मध्यस्ती केली म्हणून प्रशांत सुरेश कांबळे(वय १८ वर्षे, शिवशंभों बिल्डींग, फ्लॅट नं. १, कुंभारचावडी

विठ्ठल तांबे

धायरी : भांडणात मध्यस्ती केली म्हणून प्रशांत सुरेश कांबळे(वय १८ वर्षे,  शिवशंभों बिल्डींग, फ्लॅट नं. १, कुंभारचावडी. भैरवनाथ मंदीरासमोर, धायरीगाव) याच्यावर कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या चौघांवर सिंहगड रोड पोलीस ठाण्याकडून गुन्हा नोंदवण्यात आला.

रोहीत चव्हाण व दिपक भंडारी अशी आरोपींची नावे आहेत. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास प्रशांत सुरेश कांबळे संविधान वंजारी, साहील सुपेकर, संतोष पासवान असे भैरवनाथ मंदीरासमोर दुकानाशेजारी कट्टयावर गप्पा मारत होते. तिथेच प्रशांत याची भाजीची हातगाडी असते.

संविधान वंजारी सोबत आरोपींचे जुन्या भांडणाच्या कारणावरून  वाद झाले. त्यांनी एकमेकांना शिवीगाळी करुन हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. प्रशांत हा वाद मिटवण्याच्या हेतूने मध्ये गेला असता , तेव्हा त्याला सुध्दा मारहाण केली.

रोहीत चव्हाण , दिपक भंडारी हे परत रात्री साडेनऊच्या सुमारास तेथे आले. त्यावेळी रोहीत च्या हातामध्ये लोखंडी कोयता व दिपक भंडारी याच्या हातामध्ये बांबू होता. प्रशांत व मित्र पळून जात असताना प्रशांत याला पकडून बांबूने मारहाण करण्यात आली. रोहीत याने कोयत्याने डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. तसेच रोहित चव्हाण व दीपक भंडारी फरार असून सिहंगड पोलिस त्यांचा शोध घेत आहे. या गुन्ह्या मधील दोगे जण अल्पवयीन असून, त्यांना पोलिससांनी ताब्यात घेऊन न्यालयात हजार केले.

वरिष्ठ पोलीस निरिक्षक शैलेश संखे,  पोलीस निरिक्षक जयंत राजुरकर,सहाय्यक पोलीस निरीक्षक  सचिन निकम, फौजदार किशोरी साबळे यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपींचा शोध सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pratap Sarnaik : महाराष्ट्रात इलेक्ट्रिक दुचाकी, टॅक्सी सेवेसाठी भाडेदर निश्चित; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Priyank Kharge statement : प्रियांक खर्गेंंचं हिंदू धर्माबाबत मोठं विधान! ; निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला पडणार महागात?

Puja Khedkar: पूजा खेडकरच्या आई मनोरमा यांच्याविरुद्ध गुन्हा; सोमवारी पुन्हा बंगल्याची झडती, नेमकं काय घडलं?

NMIA: लोटस-इंस्पायर्ड डिझाईन, फ्युचरिस्टिक टेक अन्...; नवी मुंबई विमानतळ जागतिक पातळीवर चमकणार, कसं आहे नवं Airport?

Latest Marathi News Updates : एससी आरक्षण बदलल्याचा खोटा प्रचारः राहुल डंबाळे

SCROLL FOR NEXT