crime news esakal
पुणे

Pune : पती-पत्नीच्या वादात मध्यस्ती करणाऱ्या लहान भावावर कोयत्याने वार

वार करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कौटुंबिक कारणातून सरार्इत गुन्हेगार आणि त्याच्या पत्नीत सुरू असलेल्या वादात मध्यस्ती केली म्हणून सरार्इत गुन्हेगाराने त्याच्या लहान भावावर कोयत्याने वार केला. मोठ्या भावाने केलेल्या या हल्ल्‍यात छोटा भाऊ जखमी झाला आहे. हा प्रकार हॅपी कॉलनीतील शनिवारी (ता. २९) रात्री साडेअकरा वाजता घडला.

रवी श्याम वाघमारे (वय ३०, रा. हॅपी कॉलनी, गोसावी वस्ती, कोथरूड) असे वार करणाऱ्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. अलंकार पोलिसांनी त्याला अटक केली आहे.या प्रकरणी सचिन श्याम वाघमारे (वय २१, रा. हॅपी कॉलनी, गोसावी वस्ती, कोथरूड) यांनी अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी रवी आणि फिर्यादी सचिन हे भाऊ आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी सराईत गुन्हेगार आहे.

तो साथीदारांसह घातक शस्त्रे बाळगून गंभीर गुन्हे करत असतो. त्यामुळे पोलिस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी त्याला ऑगस्ट २०२१ मध्ये एक वर्षासाठी तडीपार केले होते. तडीपारीची मुदत संपल्यानंतर तो तीन महिन्यांपूर्वी शहरात आला. शनिवारी रात्री त्याचे पत्नीसोबत भांडण झाले. तेव्हा लहान भाऊ सचिन यांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावरून दोघा भावांत वाद झाला. त्यामुळे रवी याने रागाच्या भरात घरात लपवून ठेवलेला कोयता काढून सचिनच्या हातावर मारला. तसेच शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ammy Virk Attacked : कॉन्सर्ट संपवून घरी परतताना प्रसिद्ध गायक एमी विर्कच्या वाहनावर धडाधड गोळ्या झाडल्या; रोल्स रॉयसची केली चाळण

Amravati Hospital Fire: व्हेंटिलेटरच्या देखभालीअभावी तीन अर्भकांचा मृत्यू; अमरावती रुग्णालयातील पाच जण निलंबित

Pune Metro: पुणे मेट्रो लाइन ३ च्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा; माण ते बालेवाडी पहिला टप्पा पूर्ण, पीएमओला अहवाल, कधी हाेणार सुरु?

Wani Crime : मायेने घरात ठेवले, घासातला घास दिला; त्याच भाडेकरूने जीव घेतला...!

Roasted Poha Namkeen: डाएट करताय? मग नक्की ट्राय करा कमी तेलातले 'रोस्टेड पोहा नमकीन'; वजन कमी करण्याच्या प्रयत्नात ठरेल फायदेशीर!

SCROLL FOR NEXT