Mokka crime Sakal
पुणे

Mcoca Crime : पुण्यातील गुन्हेगारांविरुद्ध ‘मोका’चे अर्धशतक; २९७ जणांवर कारवाई

नागरिकांमध्ये दहशत पसरविणाऱ्या टोळ्यांवर जरब बसविण्यासाठी पोलिसांनी गुन्हेगारांची कुंडली काढून त्यांच्यावर ‘मोका’चा कायदेशीर इलाज सुरू केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - नागरिकांमध्ये दहशत पसरविणाऱ्या टोळ्यांवर जरब बसविण्यासाठी पोलिसांनी गुन्हेगारांची कुंडली काढून त्यांच्यावर ‘मोका’चा कायदेशीर इलाज सुरू केला आहे. गेल्या आठ महिन्यांत ५० टोळ्यांतील २९७ गुन्हेगारांवर ‘मोका’ कायद्यान्वये कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार आणि पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक यांच्या ‘मोका’च्या अर्धशतकी खेळीने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे.

जामिनासाठी दोन वर्षांचा कालावधी

हत्यारांचा धाक दाखवून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणे, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, बेकायदा शस्त्र बाळगणे, मालमत्तेचे नुकसान, पोलिसांच्या आदेशाचा भंग करणे अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे करणाऱ्या टोळीतील गुन्हेगारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोका) कारवाई केली जाते. या गुन्ह्यात जामीन मिळण्यास दीड ते दोन वर्षांचा कालावधी जातो.

धानोरीमध्ये तिघांना अटक

गुंड अभिषेक रमेश तांबे (वय २१, रा. धानोरी), सुमीत नागेश लंगडे (वय २५, रा. इंदिरानगर, लोहगाव रस्ता) व प्रज्ज्वल प्रशांत शिंदे (वय १८, रा. धानोरी रस्ता) यांच्यावर ‘मोका’ कायद्यांतर्गत आज कारवाई केली. रितेश कुमार यांनी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर गुंड टोळ्यांवर केलेली ही ५०वी ‘मोका’ची कारवाई आहे. या गुन्ह्यातील आरोपींनी एका तरुणावर कोयत्याने वार करून जखमी केले होते. त्यांच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणीचे गुन्हे दाखल आहेत.

‘एमपीडीए’ अंतर्गत ४० गुन्हेगार स्थानबद्ध

महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार आणि धोकादायक व्यक्तींच्या विघातक कृत्यास आळा घालण्याबाबत अधिनियम म्हणजेच ‘एमपीडीए’ कायद्यांतर्गत ४० गुन्हेगारांना एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध केले. सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा आणणे, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी करणाऱ्यांवर ‘एमपीडीए’ कायद्यांतर्गत कारवाई केली जाते. संबंधित गुन्हेगारास एक वर्ष जामीन मिळत नाही.

आकडे बोलतात

  • ५० - गुन्हेगारी टोळ्या

  • २४६ - अटक केलेले आरोपी

  • २९७ - एकूण आरोपी

  • ५१ - पाहिजे असलेले (वाँटेड) आरोपी

(कालावधी १ जानेवारी ते २० ऑगस्ट २०२३)

शहरात गुंडागर्दी खपवून घेतली जाणार नाही. सराईत गुन्हेगारांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येत आहे. सय्यदनगर आणि मंगला चित्रपटगृहाजवळ झालेल्या तरुणाच्या खून प्रकरणातील अटक केलेल्या आरोपींवर मोका कायद्यान्वये कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. आगामी काळातही गुन्हेगारांवर ‘मोका’ आणि ‘एमपीडीए’ कायद्यांतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई सुरूच राहील.

- रितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे शहर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JP Nadda: आरक्षण हटाओ आंदोलन! शिष्टमंडळाने घेतली जेपी नड्डांची भेट; 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

Marathi News Live Updates : आम्ही परराष्ट्र मंत्रालयाच्या सतत संपर्कात आहोत आणि महाराष्ट्र सरकारही यासंदर्भात चर्चा करतंय - सुळे

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

Marathi Language Rule: ऑटो-टॅक्सी चालकांना दिलासा! मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

Car Care Tips: कारमध्ये फोन चार्ज करताय? 'या' ४ चुकांमुळे मोबाईलचा ब्लास्ट अन् कारची बॅटरी होऊ शकते डेड!

SCROLL FOR NEXT