junner  sakal
पुणे

Pune : पंचलिंग शिवालयात स्वयंभू पाच शिवलिंग,तांदळाच्या पिंडीच्या दर्शनास मोठी गर्दी

शेवटचा श्रावणी सोमवार असल्याने अभिषेक व पूजेसाठी ११ हजार १११ बेल पाने , सुवर्ण बेल पत्र बुट्टे पाटील कुटुंबाने अर्पण केले.

सकाळ वृत्तसेवा

जुन्नर - ऐतिहासिक शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या प्राचीन पंचलिंग शिवालयातील स्वयंभू पाच शिवलिंगाचे तसेच तांदळाच्या पाच पिंडीचे दर्शन घेण्यासाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी (सोमवार ता.११)भाविकांनी मोठी गर्दी केली होती. श्रावणातील प्रत्येक सोमवारी येथे यात्रा भरते. आज शेवटचा श्रावणी सोमवार असल्याने दर्शनासाठी सकाळपासून भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.

शेवटचा श्रावणी सोमवार असल्याने अभिषेक व पूजेसाठी ११ हजार १११ बेल पाने , सुवर्ण बेल पत्र बुट्टे पाटील कुटुंबाने अर्पण केले. मंदिरात प्रत्येक श्रावणी सोमवारी महादेवाच्या प्रतिकात्मक मुखवट्याच्या मस्तकाच्या शिरेतून तांदळाच्या एकावर एक अशा पाच पिंडी लिंबाच्या आधारावर बनवून ठेवल्या जातात. मंदिराच्या गाभाऱ्यात पाच स्वयंभू शिवलिंगे आहेत.

कळसावर ब्रह्मा, विष्णू, महेश, लक्ष्मी या देवतांची विविध रूपे आहेत. एकूण तीन टप्प्यात लहान-मोठे १०१ कळस आहेत. मंदिरात लक्ष्मी नारायण, गणपती व पार्वती यांच्या मूर्ती आहेत मंदिराच्या दक्षिणेला भुयारी विहीर असून त्यामधून बारा महिने गोमुखातून पुष्करणीमध्ये पाण्याचे धार वाहत असते. भाविकांना मंदिरात हात पाय धुवून जाण्यासाठी छोटी कुंडी आहे. परिसरात ज्येष्ठ नागरिकांनी वृक्षारोपण केले आहे. मंदिर व परिसर विकासासाठी माजी नगराध्यक्ष कै. रावसाहेब उर्फ अनाजी धोंडजी पाटील ट्रस्ट काम करत आहे.

दर श्रावणी सोमवारी बेलाची पाने, सुवर्ण बेलपत्र,पिंडीसाठी लागणारा तांदूळ याची व्यवस्था तसेच परंपरेने कुस्त्याचा आखाडा बुट्टे पाटील कुटुंबीय पिढ्यानपिढ्या पाहत आहे.यात्रा नियोजन विश्वस्त गोविंद शंकरराव बुट्टे पाटील, शरद शंकरराव बुट्टे पाटील, प्रल्हाद बुट्टे पाटील, आकाश बुट्टे पाटील यांनी केले.

जुन्नर शहरातुन मंदिराकडे जाणाऱ्या सुमारे एक किलोमीटर रस्त्यावर दुतर्फा १८९० मध्ये आनाजी बुट्टे पाटील यांनी सावली साठी वृक्षारोपण केले आहे. याची सनद बुट्टे पाटील कुटुंबास शासनाने दिली आहे.

येथील अमरनाथ सेवा मंडळाच्या वतीने श्रावणी सोमवारी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना खिचडी व दुध वाटप करण्यात आले. मंडळाच्या वतीन भंडाऱ्याचे आयोजनाचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT