pune cyber crime cyber heist hits bharti sahakari bank rs 1 crore stolen through cloned cards Sakal
पुणे

Debit Card Fraud : डेबिट कार्ड क्लोन करून एक कोटीचा अपहार

भारती सहकारी बँक : सायबर गुन्हेगारांनी ‘एटीएम’मधून काढली रक्कम

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सायबर गुन्हेगारांनी खातेदारांची बनावट डेबिट कार्ड तयार करून भारती सहकारी बॅंकेच्या एटीएम केंद्रांतून एक कोटी आठ लाख १५ हजार रुपयांची रक्कम काढली. हा धक्कादायक प्रकार सुमारे साडेतीन वर्षांनंतर उघडकीस आला. डिसेंबर २०२० ते नोव्हेंबर २०२१ दरम्यान पुण्यासह विविध शहरांमधील १६ एटीएम केंद्रांमधून १ हजार २४७ वेळा पैसे काढले गेले.

या प्रकरणी भारती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक सर्जेराव जगन्नाथ पाटील यांनी फिर्याद दिली. त्यावरून विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सायबर गुन्हेगारांनी इतर बॅंकांच्या खातेदारांची ४३९ डेबिट कार्ड ‘क्लोन’ केली.

ती वापरून या बँकेच्या पुण्यातील सदाशिव पेठ, धायरी, धनकवडी, कोथरूड, बाणेर, हडपसर, आकुर्डी; तसेच नवी मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, इस्लामपूर, मुंबई आणि दिल्ली येथील एटीएम केंद्रांतून रक्कम बेकायदा काढण्यात आली.

यापूर्वी ऑगस्ट २०१८ मध्ये सायबर गुन्हेगारांनी कॉसमॉस बँकेची सर्व्हर यंत्रणा हॅक केली होती. त्यावेळी देश-विदेशातील एटीएम केंद्रांतून ९४ कोटी ४२ लाख रुपयांवर डल्ला मारण्यात आला होता.

ग्राहकांचे नुकसान नाही ः सर्जेराव पाटील

सर्जेराव पाटील यांनी सांगितले की, ‘हा सायबर हल्ल्याचा प्रकार नाही. कोरोना कालावधीत आमच्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढले गेले. याचा बॅंकेच्या नफ्यावर थोडा परिणाम झाला असला तरी ग्राहकांचे नुकसान झालेले नाही. मार्च २०२२ अखेर बॅंकेला १० कोटी ६७ लाख रुपयांचा नफा झाला. सायबर हल्ला टाळण्यासाठी बॅंक आवश्यक ती खबरदारी घेत आहे.

अन्य काही बॅंकांमध्येही सायबर गुन्हेगारीचा असा प्रकार नुकताच घडल्याच्या तक्रारी मिळाल्या आहेत. इतर बॅंकांची बनावट डेबिट कार्ड तयार करून आणि एटीएमच्या कॅश शटरमध्ये अडथळा निर्माण करून चोरट्यांनी रक्कम काढली आहे. अशा वेळी एरर कोड आल्यानंतर त्या व्यवहाराचा अलर्ट बॅंकेच्या मुख्य शाखेत प्राप्त होणे आवश्यक असते. तसे निरीक्षण करणारी सायबर यंत्रणा बॅंकांनी निर्माण करणे गरजेचे आहे.

- ॲड. जयश्री नांगरे, सायबरतज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

Ashadhi Wari 2025: वारकऱ्यांसोबत श्वानाची पंढरपूर वारी! महिनाभरात पालख्यांबरोबर चालत पोचतोय विठ्ठलचरणी

"उपाध्येंना अटेंशनची सवय.." निलेश साबळे-शरद उपाध्ये वादावर मराठी कलाकार व्यक्त ; म्हणाले...

PCMC News : आणखी तेरा ठिकाणी स्वस्त धान्य दुकाने; पुणे, पिंपरी-चिंचवड क्षेत्रांतील नागरिकांना ३१ जुलैपर्यंत करता येणार अर्ज

Hinjewadi News : हिंजवडी फेज २ ते लक्ष्मी चौक रस्ता होणार खुला; रस्त्यातील अतिक्रमणांवर ‘पीएमआरडीए’कडून कारवाई

SCROLL FOR NEXT