Cyber-Crime
Cyber-Crime 
पुणे

हायटेक पुणे सायबर गुन्ह्यांतही अव्वल

सकाळवृत्तसेवा

पुणे - इंटरनेट- मोबाईलच्या अतिवापराचे व्यसन लागल्याने राज्यातील ३८ शहरांसह ग्रामीण भागात २० हजार २७४ गुन्हे घडले आहेत. त्यात अपघात, खून, आत्महत्या, सायबर गुन्हेगारीत वाढ होत आहे. त्यात १२ पासून २५ वर्षांपर्यंतच्या तरुण-तरुणींची संख्या जास्त असल्याचे आहे. विशेष म्हणजे चार वर्षांत पुणे शहरात १३,३५७ गुन्ह्यांची नोंद पुणे पोलिसांकडे झाली आहे. त्यातील १२,६८३ खटले सोडविले आहेत.

याबाबत आनंदवन व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्राचे अध्यक्ष डॉ. अजय दुधाणे म्हणाले, ‘‘व्यसनमुक्ती केंद्राने सरकारकडून २०१४ ते २०१८ या कालावधीत इंटरनेट आणि मोबाईलच्या माध्यमातून झालेल्या गुन्ह्यांची आकडेवारी मागविली. यामध्ये राज्यात सर्वांत जास्त म्हणजे १३ हजार ३५७ गुन्ह्यांची नोंद फक्‍त पुणे शहरात झाली आहे. त्यापाठोपाठ ठाण्यात एक हजार १९ गुन्ह्यांची नोंद झाली असून यात आत्महत्या, खून, अपघातांचा समावेश आहे. हिंगोलीत सर्वांत कमी गुन्ह्यांची नोंद झाल्याचे आढळून आले आहे.’’

अत्याधुनिक साधनांच्या वापरावर मर्यादा ठेवल्यास गुन्ह्यांचे प्रमाण निश्‍चितच कमी होईल. इंटरनेट- मोबाईलच्या व्यसनामुळे घडलेल्या गुन्ह्यांमधील गुन्हेगारांना समुपदेशनाचे कार्य आनंदवन व्यसनमुक्ती केंद्रातर्फे करण्यात येत असल्याचे केंद्राचे समुपदेशक हर्षल पंडित यांनी सांगितले.

काय आहेत लक्षणे...
  मोबाईल जवळ नसल्यास तुम्ही अस्वस्थ होता का?
  मोबाईलवर आलेला प्रत्येक कॉल, मेसेजवर तुमचं लक्ष असतं का?
  तुम्ही, तुमची मुले किती वेळ मोबाईल इंटरनेटवर काय सर्च करता?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT