Pune Dam Sakal
पुणे

Pune Dam: चासकमान धरणात शंभर टक्के पाणीसाठा; खेड तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर ओसरला

धरण प्रशासनाकडून माहिती.

सकाळ डिजिटल टीम

चास - खेड तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर ओसरला असून चास-कमान धरणात होणारी पाण्याची आवक कमी झाली आहे. तरी सद्य:स्थितीत धरणात १०० टक्के (८.५३ टीएमसी) पाणीसाठा असल्याची माहिती धरण प्रशासनाने दिली आहे.

जुलै महिन्याच्या सुरुवातीला धरणात २१.२९ टक्के (२.५७ टीएमसी) पाणीसाठा होता. त्यावेळी पाऊस लांबल्यास पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. तसेच अमर्याद पाणी सोडल्याने धरणातील पाणी संपल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती. त्यानंतर जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने जोरदार सुरुवात केल्याने ही धरणे तुडूंब भरली.

पावसाचा जोर कायम राहिल्याने सर्वप्रथम चास-कमान धरण साखळीत असणारे कळमोडी धरण १७ जुलै रोजी ‘ओव्हफ्लो’ झाले. त्याचे पाणी चास-कमान धरणात येण्यास सुरुवात झाली होती. तसेच भिमाशंकर खोऱ्यात पावसाचा जोर वाढल्याने चास-कमान धरणातील पाणीसाठ्याने नव्वदी पार केली होती.

चास-कमान धरणाचे पाचही दरवाजे उघडून भीमा नदीपात्रात २८ जुलै रोजी विसर्ग सुरू केला होता. त्यानंतर पावसाच्या प्रमाणानुसार धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग कमी-जास्त करण्यात येत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून पाऊस थांबला असून ऊन पडण्यास सुरूवात झाली आहे.

त्यामुळे धरणात येणारी आवक जवळपास थांबली असल्याने धरणाचे उघडलेले पाचही दरवाजे बंद केले आहेत. धरणात सद्य: स्थितीत १०० टक्के पाणीसाठा असून वीज निर्मितीनंतर भीमा नदीपात्रात ३०० क्युसेक, तर धरणाच्या कालव्याव्दारे ५५० क्यूसेक असा एकूण ८५० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरण परिसरात एक जूनपासून ३४२ मी.मी. पावसाची नोंद झाली आहे.

पवना धरणामध्ये शंभर टक्के साठा

पिंपरी शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण शंभर टक्के भरले. त्यामुळे पुढील वर्षी जुलैअखेरपर्यंतची पाण्याची चिंता मिटली आहे. यावर्षी साधारण पंधरा दिवस उशिरा पावसाने हजेरी लावली. तेव्हापासून अद्यापपर्यंत दमदार पाऊस झाला नाही. अधून-मधून होणाऱ्या संततधार पावसामुळे धरणातील साठा वाढण्यास विलंब झाला.

आतापर्यंत धरण क्षेत्रात दोन हजार १६९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. वीजनिर्मिती केंद्रातून ७९३.४७ क्यूसेकप्रमाणे विसर्ग सुरू आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पवना नदीवरील रावेत बंधाऱ्यातून दररोज ५१० दशलक्ष लिटर अशुद्ध जलउपसा केला जातो. दरवर्षी जुलैअखेरपर्यंत पाणी पुरेल, अशा पद्धतीने धरणातील पाण्याचे नियोजन केले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 News: MS Dhoni च्या चाहत्यांना झटका देणारी बातमी, CSK च्या वाढल्या अडचणी; सराव सत्रात जे घडलं, ते खूपच धक्कादायक...

Bhima Water Politics: भीमा नदीत पाणी सोडण्यावर श्रेयवादाची लढाई; राजकीय नेत्यांच्या वादात नदीकाठचा शेतकरी होरपळला

Gen Z Trend Deadzoning: मोबाइल बंद, लॅपटॉप बंद; Gen Z आणि Millennials मध्ये ‘डेडझोनिंग’ची क्रेझ; नेमकं 'हे' आहे तरी काय ?

Tembhapuri Dam Tragedy: टेंभापुरी धरणात १९ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; प्रशासनाच्या दुर्लक्षाचा आरोप

Pune Ragging : पुण्यातील आयएलएस लॉ कॉलेज वसतिगृहात रॅगिंग प्रकरण उघड

SCROLL FOR NEXT