pune dam water level 95 percent water storage 27tmc monsoon weather rain sakal
पुणे

Pune Dam Water Level : टेमघरला ४५ मिलीमीटर पाऊस; चारही धरणात ९५.१६ टक्के पाणीसाठा

चार ही धरणात मिळून २७.७४ टीएमसी म्हणजे ९५.१६ टक्के पाणीसाठा

सकाळ वृत्तसेवा

खडकवासला : धरण साखळीत शनिवारी रात्री दहा वाजेपर्यंत पानशेत येथे तीन, वरसगाव येथे सात, खडकवासला येथे २ तर टेमघरला ४५ मिलीमीटर पाऊस झाला. दरम्यान, शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण साखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर या चार ही धरणात मिळून २७.७४ टीएमसी म्हणजे ९५.१६ टक्के पाणीसाठा आहे.

खडकवासला धरणात १.४४ टीएमसी म्हणजे ७२.८३ टक्के पाणीसाठा आहे. टेमघरमध्ये २.८३ टीएमसी म्हणजे ७६.३७ टक्के पाणीसाठा झाला आहे. पानशेत, वरसगाव, पवना, भामा- आसखेड धरण १०० टक्के भरले आहे.

शहरात दुपारी एक ते तीन वाजण्याच्या दरम्यान कोथरूड, कर्वेनगर, वारजे, शिवणे व सिंहगड रस्ता भागात मुसळधार पाऊस पडला. रस्त्यावर अनेक ठिकाणी अर्धा फुटापेक्षा जास्त पाणी साठले होते.

चार ही धरणातून विसर्ग सुरु

पानशेतमधून ६०० क्युसेक, वरसगावमधून एकूण एक हजार १९७ क्युसेक व टेमघरमधून ३५० क्युसेक पाणी सोडले आहे. या तिन्ही धरणातून सोडलेले दोन हजार १४७ क्युसेक पाणी खडकवासला धरणात जमा आहे. तर खडकवासला धरणातून शेतीसाठी १०५४ क्युसेक पाणी सोडले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार प्रत्येकी ३००० रुपये; निधी मागणीची फाईल वित्त विभागाकडे; बालसंगोपन योजनेसाठीही मिळणार १०० कोटी

पोलिस ठाण्यात जाऊनही न्याय मिळत नाही, चिंता नको, आता प्रत्येक शनिवारी भेटणार ‘एसपी’! सोलापूर पोलिसांचे ‘न्याय संवाद’ ॲप, ‘या’ क्रमांकावर करा तक्रार

HSC Hall Ticket 2026: विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट! आजपासून बारावीचे हॉल तिकीट उपलब्ध; असे करा डाउनलोड

प्रचार उद्या थांबणार! मंगळवारी रात्रीपासून उमेदवारांच्या हालचालींवर राहणार नजर; रात्री १० नंतर सोलापूर शहरातील पक्ष कार्यालये, दुकाने राहणार बंद, वाचा...

e-SIM Fraud Awareness : ई-सिम कार्डच्या नावावर फसवणूक

SCROLL FOR NEXT