Pune Dam Water Level  Sakal
पुणे

Pune Dam Water Level : खडकवासला येथे २५ मिलीमीटर पाऊस; चार धरणात मिळून २७.५६ टीएमसी म्हणजे ९४.५५ टक्के पाणीसाठा

पानशेत येथे तीन, वरसगाव येथे तीन, टेमघरला ११ तर खडकवासला येथे २५ मिलीमीटर पाऊस

सकाळ वृत्तसेवा

खडकवासला : शुक्रवारी रात्री दहा वाजेपर्यंत पानशेत येथे तीन, वरसगाव येथे तीन, टेमघरला ११ तर खडकवासला येथे २५ मिलीमीटर पाऊस झाला. दरम्यान, शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण साखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर या चार ही धरणात मिळून २७.५६ टीएमसी म्हणजे ९४.५५ टक्के पाणीसाठा आहे.

खडकवासला धरणात १.२८ टीएमसी म्हणजे ६५.७२ टक्के पाणीसाठा आहे. टेमघर मध्ये २.८२ टीएमसी म्हणजे ७५.९७ टक्के पाणीसाठा झाला आहे. पानशेत, वरसगाव, पवना, भामाआसखेड धरण १०० टक्के भरले आहे.

चार ही धरणातून विसर्ग सुरु

पानशेत मधून एक हजार २८३ क्युसेक, वरसगाव मधून एकूण एक हजार १९७ क्युसेक व टेमघर मधून ३५० क्युसेक पाणी सोडले आहे. या तिन्ही धरणातून सोडलेले दोन हजार ८२० क्युसेक पाणी खडकवासला धरणात जमा आहे. तर खडकवासला धरणातून शेतीसाठी १००५ क्युसेक पाणी सोडले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपचा बालेकिल्ला सर केला! प्रशांत किशोरांचा विजय कसा शक्य झाला? विजयामागची 5 मोठी कारणं

Mumbai Crime: मामाचा राग भाच्यावर काढला, तरुणानं १ वर्षीय चिमुकल्याचं अपहरण केलं, डोंबिवलीत बंद रिक्षात सोडून फरार

Latest Marathi News Live Update : अग्निशमन दलाच्या जवानांकडून पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या युवकाला जीवदान

Latur News : एसआयआर मोहिमेत जळकोट तालुका राज्यात अव्वल; मतदार यादी पुनरिक्षणाचे १०० टक्के काम पूर्ण

ICC Bans Cricketer: ICC ची मोठी कारवाई! अमेरिकेच्या ‘या’ क्रिकेटपटूवर तब्बल ८ वर्षांची बंदी; नेमकं काय केलं?

SCROLL FOR NEXT