File Photo esakal
पुणे

Pune Dam Water: पुण्याच्या धरणांमध्ये फक्त २८.३९ टीएमसी पाणी शिल्लक; पुढील दोन महिने पाणी संकटाची चिन्हं

आतापर्यंत उजनीतील अचल (मृतसाठा) साठ्यातील १९.११ टीएमसी पाणी वापरलं आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : जिल्ह्यातील २६ धरणांमध्ये मिळून आजअखेरपर्यंत (ता. २७) ५६.३१ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. सध्याच्या उपयुक्त पाणीसाठ्याचं हे प्रमाण एकूण साठ्याच्या तुलनेत केवळ २८.३९ टक्के इतके अल्प आहे. हा उपलब्ध साठा गेल्या वर्षीच्या आजच्या तारखेच्या तुलनेत ३८.८८५ टीएमसीने कमी आहे.

पुरंदर तालुक्यातील नाझरे धरण कोरडे पडले असून उजनीतील उपयुक्त साठा शून्याच्या खाली गेला आहे. आतापर्यंत उजनीतील अचल (मृतसाठा) साठ्यातील १९.११ टीएमसी पाणी वापरले आहे. (Pune dams only 28.39 tmc water left water crisis may seen ahead)

गेल्या वर्षीच्या आजच्या तारखेला जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण ९५.१९ टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध होता. गेल्या वर्षीच्या उपलब्ध पाणीसाठ्याचे प्रमाण हे ४७.९९ टक्के इतके होते. त्यामुळे यंदाचा आजअखेरचा उपलब्ध पाणीसाठा हा गेल्या वर्षीच्या तुलनेत १९.६० टक्क्यांनी कमी झाला आहे. या २६ धरणांव्यतिरिक्त टाटा समूहाच्या सहा धरणांमधील साठा वेगळा आहे. जिल्ह्यात एकूण ३२ धरणे आहेत. यापैकी सहा धरणे टाटा समूहाची व उर्वरित २६ धरणे आहेत.

जिल्ह्यातील धरणांमध्ये उजनी, भामा आसखेड, माणिकडोह, चासकमान, पवना, मुळशी, टेमघर, वरसगाव, पानशेत, गुंजवणी, नीरा देवधर, भाटघर, वीर आदी प्रमुख धरणांचा समावेश आहे. सर्व प्रमुख धरणांसह जिल्ह्यातील सर्व धरणांतील मिळून एकूण उपयुक्त पाणीसाठा क्षमता १९८.३४ टीएमसी इतकी आहे.

‘टाटां’च्या धरणांत २१.९० टीएमसी पाणी

टाटा उद्योग समूहाच्या धरणांमध्ये मुळशी, ठोकळवाडी, शिरोटा, वळवण, लोणावळा आणि कुंडली यांचा समावेश आहे. या सहा धरणांची एकूण साठवण क्षमता ४२.७६ टीएमसी आहे. यापैकी सध्या २१.९० टीएमसी (५१.२१ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

प्रमुख धरणांमधील बुधवारचा साठा (टीएमसीमध्ये)

- टेमघर --- ०.३३

- वरसगाव --- ६.६४

- पानशेत --- ४.९६

- खडकवासला --- १.०८

- पवना --- ३.९९

- चासकमान --- २.६८

- भामा आसखेड --- ३.६५

- आंद्रा --- १.६४

- गुंजवणी --- १.६६

- भाटघर --- ८.०३

- नीरा देवघर ---४.२७

- वीर --- ४.२५

- माणिकडोह --- १.०९

- येडगाव --- ०.८९

- डिंभे --- ५.२४

‘टाटां’च्या धरणांतील पाणीसाठा (टीएमसीमध्ये)

- मुळशी --- ९.१९

- ठोकळवाडी --- ६.९७

- शिरोटा --- ४.२५

- वळवण --- १.३४

- लोणावळा --- शून्य

- कुंडली --- ०.१५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT