पुणे

भरदिवसा, भरचौकामध्ये गोळीबारासह कोयत्याने हल्ला आंदेकर टोळीचे कृत्य, एकजण गंभीर जखमी

CD

पुणे, ता. २० : माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणातील मुख्य आरोपी आकाश म्हस्के याचा भाऊ अक्षय उर्फ बाळू बापू मस्के (वय २६) याच्यावर बुधवारी भरदिवसा, भर चौकात गोळीबार करून कोयत्याने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अक्षय गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी सहा जणांना रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले.
पुणे- सातारा रस्त्यावरील बालाजीनगर परिसरातील राजर्षी शाहू बॅंकेजवळ वर्दळीच्या चौकात सकाळी दहाच्या सुमारास ही थरारक घटना घडली. हल्ल्याचा प्रकार पाहून, नागरिकांमध्ये घबराट पसरली होती.
आंदेकर आणि कोमकर-म्हस्के टोळ्यांमधील वर्चस्वाच्या वादातून हा प्रकार घडला. याप्रकरणी जखमीची पत्नी करूणा अक्षय मस्के (वय २२, रा. आंबेगाव पठार) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आंदेकर टोळीतील कृष्णा आंदेकर, बंडू आंदेकर, तुषार निरंजन वाडेकर, स्वराज निरंजन वाडेकर, अमित बहादुरकर, स्वप्नील बहादूरकर, निघेश विंचुरकर, वेदांत टेमगिरे, आवेज अश्फाक पठाण, ऋषी आंबट, लाला उर्फ अमन याच्यासह १२ जणांवर रात्री सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेने एका अल्पवयीन मुलासह सहा जणांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक अक्षय मस्के हा सकाळी दहाच्या सुमारास पुणे-सातारा रस्त्यावरील बालाजीनगर परिसरात आला होता. त्यावेळी आरोपी आंदेकर याच्या सांगण्यावरून दुचाकीवरून आलेल्या निघेश विंचुरकर, वेदांत टेमगिरे, आवेज शेख, ऋषी आंबट, लाला उर्फ अमन या हल्लेखोरांनी अक्षय याच्यावर कोयत्याने वार करून पिस्तुलातून तीन गोळ्या झाडल्या. त्यानंतर आरोपी पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलिस आयुक्त राजेश बनसोडे, पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
अक्षयचा भाऊ आकाश मस्के हा वनराज आंदेकर खून प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक आहे. हत्येसाठी मध्यप्रदेशातून पिस्तुले आणि काडतुसे आणण्यात त्याची महत्त्वाची भूमिका असल्याचे तपासात समोर आले होते.
कौटुंबिक वाद आणि गुन्हेगारी वर्चस्वातून माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची एक सप्टेंबर २०२४ रोजी नाना पेठ परिसरात गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत २१ आरोपींविरुद्ध १७०० पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात UCC लागू करण्याची तयारी! महायुती सरकारने घेतला मोठा निर्णय; ७ सदस्यीय तज्ज्ञ समिती स्थापन

Mumbai Pune Railway : मुंबई-पुणे रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मुसळधार पावसामुळे एक्स्प्रेस रद्द, कोणत्या आणि कधीपर्यंत?

Ulhasnagar: कर्तव्यावर असतानाच काळाचा घाला! वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; कुटुंबाला 50 लाखांच्या मदतीची मागणी

OMG : ४७ षटकार...! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये संघाने कुटल्या ४१७ धावा; ओपनरचे ५४ चेंडूंत द्विशतक, तर दोघांची शतकं... १८८ धावांनी मॅच जिंकली

Mumbai Local: वसई-विरारमधील रेल्वे रुळ ४०० मिमी उंचावणार; पावसाळ्यातील जलसंकटावर पश्चिम रेल्वेचा कायमस्वरूपी उपाय

SCROLL FOR NEXT