पुणे

पुणे जिल्ह्यात तीन लाखांहून अधिक मृत मतदार

CD

पुणे, ता. २४ : मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेनंतर जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांत एकूण ९० लाख ८० हजार १७३ मतदारांपैकी ३ लाख १२ हजार ४८ मतदार मृत असल्याचे समोर आले आहे. त्यापैकी पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांत १ लाख २७ हजार १९१ मतदार मृत आढळले आहे. त्यामध्येही सर्वाधिक २४ हजार ५१९ मृत मतदार कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात आढळले आहेत.

वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरूड, खडकवासला, पर्वती, हडपसर, पुणे कँन्टोन्मेंट आणि कसबा पेठ असे आठ विधानसभा मतदारसंघ पुणे शहरात येतात. त्यामध्ये कसबा पेठ मतदारसंघानंतर वडगाव शेरीत १६ हजार ४८१, पर्वतीत १६ हजार ३३२, शिवाजीनगरमध्ये १४ हजार ९६३, हडपसरमध्ये १४ हजार ७१८, कोथरूडमध्ये १४ हजार ४१८, खडकवासल्यात १४ हजार १७९ आणि पुणे कँन्टोन्मेंट मतदारसंघात ११ हजार ५८१ मृत मतदार असल्याचे दिसून आले आहे.

शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांत ४४ हजार ६१६ मतदारांची दुबार नोंदणी आढळली आहे. सर्वाधिक १० हजार ८०७ दुबार मतदार वडगाव शेरीत, तर सर्वांत कमी ३ हजार ७३९ मतदार पुणे कँन्टोन्मेंटमध्ये आहेत. शहरातील एकूण दुबार मतदार ४४ हजार ६१६ असून, जिल्ह्यात ही संख्या १ लाख ४३ हजार ९७५ इतकी आहे.

आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये १० लाख २६ हजार २९७ मतदार अनुपस्थित अथवा शोध न लागलेल्या प्रवर्गात आहेत. सर्वाधिक २ लाख ५७ हजार १३० मतदार हडपसरमध्ये, तर सर्वांत कमी ६ हजार ६३१ मतदार पर्वती मतदारसंघात आहेत. शहरात १० लाख २६ हजार २९७ तर जिल्ह्यात १७ लाख ८३ हजार ५८ अनुपस्थित मतदार आहेत.

शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांत २ लाख ५६ हजार ८१६ मतदार कायमस्वरूपी स्थलांतरित झाल्याचे पडताळणीत समोर आले आहे. सर्वाधिक १ लाख २४ हजार ९६८ स्थलांतरित मतदार पर्वतीत, तर सर्वांत कमी ९ हजार ५०९ मतदार पुणे कँन्टोन्मेंटमध्ये आहेत. शहरातील एकूण स्थलांतरित मतदार २ लाख ५६ हजार ८१६ असून, जिल्ह्यातील एकूण स्थलांतरित मतदार ५ लाख ९१ हजार ३८ आहेत.

ज्या मतदारांनी गणना अर्ज घेतले मात्र, परत केले नाहीत, तसेच त्यावर स्वाक्षरीच केली नाही अशा मतदारांना अन्य श्रेणीत टाकण्यात आले आहे. शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांत ‘अन्य’ श्रेणीमध्ये एकूण २८ हजार ४४५ मतदारांची नोंद झाली आहे. या श्रेणीतील सर्वाधिक १० हजार ८७३ मतदार कसबा पेठ मतदारसंघात, तर सर्वांत कमी ३१ मतदार पर्वती मतदारसंघात आहेत. शहरातील ‘अन्य’ श्रेणीतील एकूण मतदार २८ हजार ४४५, जिल्ह्यातील ‘अन्य’ श्रेणीतील एकूण मतदार ३८ हजार १०४ आहेत.
------
शहरातील वगळलेल्या मतदारांची आकडेवारी
मृत मतदार : १,२७,१९१
दुबार नोंदणी असलेले मतदार : ४४,६१६
अनुपस्थित किंवा शोध न लागलेले : १०,२६,२९७
कायमस्वरूपी स्थलांतरित : २,५६,८१६
अन्य मतदार : २८,४४५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अभिजीत दीपकेंना विचारलं- देशाचा बेस्ट PM कोण? क्षणाचाही विलंब न करता घेतलं 'या' नेत्याचं नाव; बेस्ट CM साठी घेतली तीन नावं

Bidkin News: बिडकीनच्या DMIC हद्दीत अज्ञात महिलेचा संशयास्पद मृतदेह; घातपाताचा संशय, पोलिस तपास सुरू

CNG-PNG महागणार? शेणापासून तयार होणाऱ्या CBG ची किंमत वाढली; ग्राहकांच्या खिशावर कसा परिणाम होणार?

Amravati Hospital Fire : निधी नव्हता म्हणून फायर ऑडिटला विलंब, अमरावतीतील रुग्णालयाबाबत धक्कादायक माहिती समोर

Pune Court: न्यायसेवेतील प्रदीर्घ अनुभव पुण्याच्या न्यायालयाच्या कामी; अंजू शेंडे यांनी स्वीकारला प्रमुख न्यायाधीशपदाचा पदभार

SCROLL FOR NEXT