Pune sakal
पुणे

Pune : अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशास अर्ज करण्यासाठी शुक्रवारपर्यंत मुदतवाढ

सीईटी सेलतर्फे अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या (चार वर्ष बी.ई. आणि बी.टेक) ऑनलाइन नोंदणी आणि अर्ज सादर करण्यासाठी सोमवारपर्यंत मुदत होती.

मीनाक्षी गुरव : सकाळ वृत्तसेवा

Pune - बारावीनंतरच्या अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी आणि अर्ज सादर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) अखेर मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता येत्या शुक्रवारपर्यंत (ता. ७) ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

सीईटी सेलतर्फे अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या (चार वर्ष बी.ई. आणि बी.टेक) ऑनलाइन नोंदणी आणि अर्ज सादर करण्यासाठी सोमवारपर्यंत मुदत होती. परंतु प्रवेश प्रक्रियेत अर्ज भरण्यासाठी आणखी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी विद्यार्थी-पालकांकडून होत होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत सीईटी सेलने अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे.

राज्यातील सर्व शासकीय, अनुदानित, विद्यापीठाचे व्यवस्थापन असणाऱ्या संस्था आणि विभाग, विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शिक्षण संस्थांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये बी.ई आणि बी.टेक प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ही प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने राबविण्यात येत आहे.

या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी, प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्यासाठी बुधवारपर्यंत मुदत आहे. तर कागदपत्रांच्या पडताळणी, अर्ज निश्चिती करणे याकरिता शनिवारपर्यंत (ता. ८) मुदत दिली आहे. तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे पुढील वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, असे सीईटी सेलने यापूर्वीच जाहीर केले आहे.

अधिक माहितीसाठी संकेतस्थळ : www.mahacet.org

बी.ई/बी.टेक प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक -

तपशील : कालावधी

- ऑनलाइन नोंदणी, अर्ज सादर करणे, प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे - ७ जुलैपर्यंत

- कागदपत्रांची पडताळणी, पडताळणीची पद्धत निवडणे, अर्ज निश्चिती करणे : ८ जुलैपर्यंत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Ramtirth Waterfall : पांढराशुभ्र फेस अन् खळखळणारा आवाज! आंबोलीतील प्रसिद्ध रामतीर्थ धबधबा प्रवाहित; पावसाच्या पाण्यामुळं खुललं सौंदर्य, पर्यटकांची गर्दी

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT