Pune Lockdown eSakal
पुणे

एसटी चालू ठेवल्याचा निर्णय दिलासादायक; विद्यार्थी, नोकरदारांनी धरली गावाकडची वाट

मागील दोन-तीन दिवसापासून लॉकडाऊन होणार याची चर्चा होत असताना कित्येक नागरिकांनी गावी जाणे पसंत केले.

विनायक होगाडे

शिवाजीनगर : महाराष्ट्रात (बुधवार ता:१४) रात्री ८ पासून संचारबंदी लागू करण्यात आल्याने पुण्यात नोकरी, शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी तसेच नागरिकांनी गावाकडची वाट धरली आहे. मागील दोन-तीन दिवसापासून लॉकडाऊन होणार याची चर्चा होत असताना कित्येक नागरिकांनी गावी जाणे पसंत केले. पुण्यात राहून आर्थिक खर्च परवडणारा नाही तसेच संचार बंदी लागू केल्याने गावाकडे जाऊन शेतातील कामे, अभ्यास करता येईल या उद्देशाने विद्यार्थी, नोकरदार यांनी गावाकडची वाट धरत आहेत.बार्शी, लातूर, उस्मानाबाद, सातारा, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, ,गोवा- पणजी, नाशिक, नागपूर या ठिकाणच्या गाड्या शिवाजीनगर आगार मधून जात आहेत. शिवाजीनगर आगर येथे आज बुधवार सकाळपासून एस टी ने गावाकडे जाण्यासाठी प्रवाशांनी गर्दी केली होती.

मास्क शिवाय प्रवास बंदी असल्याने अनेक प्रवासी मास्क चा वापर करताना दिसले.

"मागील दोन दिवसांपासून प्रवाशांच्या मागणीनुसार जादा गाड्या सोडल्या आहेत.शासनाच्या सुचनेचे पालन केले जाते.चालक, वाहकांना कोरोना लस तसेच कोरोना टेस्ट कायदेशीर केली आहे.कोणताही प्रवाशी उभा राहून जाणार नाही याची दक्षता घेतली जाते.

पुढील दोन चार दिवसात प्रवाशी कमी झाले तर बस कमी करण्यात येतील.प्रवाशांच्या गरजेनुसार सध्या बस सुरू आहेत".
- जनार्धन लोंढे, शिवाजीनगर आगार स्थनक प्रमुख.

"पुण्यात शिक्षण घेत आहोत,आज संध्याकाळी आठ पासून संचारबंदी तसेच हॉस्टेल बंद केल्यामुळे गावाकडे जात आहे.. मॉडर्न कॉलेज शिवाजीनगर येथे शिक्षण घेत आहोत.

गैरसोय होईल म्हणून गावाकडे चाललो आहोत.खाजगी हॉस्टेल असल्याने बंद केले आहे"
- बालाजी सुर्यवंशी, शिरुर प्रवासी

"गावाकडे शेतीचे काम चालू आहे, बांधकाम चालू आहे.एस .टी चालू आसल्याने घरी जाऊ शकतो.एस.टी.चालू ठेवल्याचा शासनाचा दिलासादायक निर्णय आहे".
- रघुनाथ सावंत,प्रवाशी सुस रोड प्रवासी

"कोथरूड येथील एम.आय.टी कॉलेज मध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे.संचार बंदीमुळे गावाकडे जात आहे.मैत्रीणी आपापल्या परीने गावाकडे गेल्या आहेत".
- रिध्दी शहा,मालेगाव प्रवसी विद्यार्थिनी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Budget: इतिहासात पहिल्यांदाच अशी वेळ! अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांसाठी कसोटीची परीक्षा; सत्ताधाऱ्यांचा वरचष्मा?

Viral Video : लिफ्टमध्ये अडकल्या दोन लहान मुली! चिमूकलीने स्वतःला धोक्यात घालून वाचवला त्यांचा जीव, ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल

भीतीने बोबडी वळेल! 'या' इंडोनेशियन Horror सिनेमाने ओलांडल्या भीतीच्या सीमा; YouTube वर रंगलीये याच चित्रपटाची चर्चा

Cat Treatment Dispute : मांजरीच्या औषधावरून नागपुरात राडा! क्लिनिकमध्ये घुसून कर्मचाऱ्याला बेदम मारहाण; डॉक्टरलाही दिली जीवे मारण्याची धमकी, नक्की काय घडलं?

Tax Benefits: Tax वाचवायचा आहे? मग आयकर कायद्यातील ‘या’ 10 सवलतींचा घ्या फायदा; होईल लाखोंची बचत!

SCROLL FOR NEXT