Pune-Delhi Flight sakal
पुणे

Pune-Delhi Flight : विमानाला धडक, चौकशीसाठी पथक;‘डीजीसीए’चे तीन सदस्य पुण्यात दाखल

पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडिया कंपनीच्या विमानाला गुरुवारी पुणे विमानतळावर ‘पुश बॅक टग’ची धडक बसून मोठा अपघात झाला. हवाई क्षेत्रातील ही घटना अत्यंत गंभीर असल्याने केंद्रीय नागरी विमान वाहतूक संचालनालयाचे (डीजीसीए) तीन सदस्यांचे पथक शुक्रवारी सकाळी दिल्लीहून पुणे विमानतळावर दाखल झाले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडिया कंपनीच्या विमानाला गुरुवारी पुणे विमानतळावर ‘पुश बॅक टग’ची धडक बसून मोठा अपघात झाला. हवाई क्षेत्रातील ही घटना अत्यंत गंभीर असल्याने केंद्रीय नागरी विमान वाहतूक संचालनालयाचे (डीजीसीए) तीन सदस्यांचे पथक शुक्रवारी सकाळी दिल्लीहून पुणे विमानतळावर दाखल झाले. आज अपघातग्रस्त विमानाची पाहणी केल्यानंतर संबंधित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली.

पुणे विमानतळावर एका आठवड्यात दोन अपघात घटना घडले असून ते गंभीर स्वरूपाचे आहेत. त्यामुळे या अपघातांची ‘डीजीसीए’कडून चौकशी सुरु आहे. गुरुवारच्या अपघातात विमानाचे मोठे नुकसान झाले. हे विमान जोपर्यंत दुरुस्त होणार नाही तोपर्यंत ते विमानतळाच्या टॅक्सी ट्रॅकच्या बाजूलाच राहणार आहे. प्रवासी सेवेसाठी हे विमान उपलब्ध नसल्याने एअर इंडियाचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.

या प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यांचीही चौकशी सुरू झाली. यात प्रामुख्याने ग्राउंड स्टाफ’चा समावेश आहे. चूक कशी झाली, जबाबदार कोण आहे अशा मुद्द्यांवर चौकशी सुरू आहे. त्याचा अहवाल ‘डीजीसीए’कडे पाठविण्यात येईल. त्यांच्याकडून पुढील कारवाई होईल.

विमानतळ प्रशासनाने या अपघाताची गंभीर दखल घेतली आहे. कारणांचा शोध घेण्यासाठी ‘डीजीसीए’चे पथक पुण्यात आले आहे. त्यांच्याकडून माहिती घेतली जात आहे. अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत म्हणून विमानतळावरील तसेच सर्व विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचे उल्‍लंघन झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई होईल.

- संतोष ढोके,

संचालक, लोहगाव विमानतळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात INDIA आघाडी एकवटणार? 'या' तारखेला दिल्लीत मोठी बैठक

Madha Ganeshotsav : माढ्याची अनोखी गणेशोत्सव परंपरा! आगमनही अन् विसर्जनही मिरवणुकीविना, अनेक वर्षांची परंपरा

दुष्काळ जाहीर झाला... मदत कधी मिळणार?

Accident: मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ३ कंटेनरचा विचित्र अपघात; दोघांचा मृत्यू; रस्त्यावर सांडले फेविकॉल, वाहतुकीवर परिणाम

IND vs WI: विराट कोहली इतिहास घडवणार? सचिन तेंडुलकरला मागे टाकत ३ वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी

SCROLL FOR NEXT