Pune  Sakal
पुणे

Pune : कात्रज परिसरात अनाधिकृत बीफ दुकाने बंद करण्याची मागणी

या दुकानांवर कारवाई करत दुकाने बंद करण्यात यावीत अशी मागणी शिवशंभू प्रतिष्ठानतर्फे धनकवडी सहकार नगर क्षेत्रिय कार्यालयाकडे करण्यात आली

अशोक गव्हाणे

कात्रज - संतोषनगर परिसरात अनाधिकृत बीफ दुकाने चालू आहेत. या दुकानात गाईंचे मांस विकले जात असून गोहत्या बंदी असताना हे सर्रास केले जात असल्याने या दुकानांवर कारवाई करत दुकाने बंद करण्यात यावीत अशी मागणी शिवशंभू प्रतिष्ठानतर्फे धनकवडी सहकार नगर क्षेत्रिय कार्यालयाकडे करण्यात आली आहे.

गायीला हिंदू धर्मात देवता म्हणून पुजले जात असल्याने परिसरातील नागरिकांच्या भावना दुखावल्या जात आहेत. दुकानांना परवाने नसताना ही दुकाने सर्रास चालविण्यात येतात. त्यामुळे परिसरातील सामाजिक सलोख्याचे वातावरण दुषित होत चालले आहे.

अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून, क्षेत्रिय कार्यालयाकडून तत्काळ कारवाई करत ही दुकाने बंद करण्यात यावीत, अशी मागणी प्रतिष्ठानतर्फे अध्यक्ष महेश कदम, अमित पांडे, ऋषिकेश जाधव, स्वप्निल लिपाणे यांनी सहायक आयुक्त सुरेखा भणगे यांच्याकडे केली आहे.

प्रतिक्रिया

सबंधित अधिकाऱ्यांना याविषयी पाहणी करण्याच्या सूचना करण्यात आल्या असून अशाप्रकारे काही आढळून आल्यास कायद्यान्वये योग्य कारवाई करू. तसेच, याबाबत वरिष्ठांकडेदेखील पाठपुरावा करू.

सुरेखा भणगे, सहायक आयुक्त, धनकवडी सहकारनगर क्षेत्रिय कार्यालय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT