Crime News sakal
पुणे

Pune : चहाची टपरी चालविण्यासाठी दररोज ५०० रुपयांच्या खंडणीची मागणी

खंडणी मागणाऱ्या तरुणास अटक

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मला दररोज ५०० रुपये हप्ता द्यायचा, तरच टपरी लावायची. पैसे देणार नसेल तर तुला येथे टपरी लावू देणार नाही, असे म्हणत एका तरुणाने दोघांना जीवे मारण्याची धमकी दिली. विमानतळ परिसरात मंगळवारी (ता. ९) सकाळी ही घटना घडली.

धमकी दिल्याप्रकरणी एका विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. करण हातागळे (वय २५, रा. यमुनानगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी ३० वर्षीय व्यक्तीने विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची मंत्री आयटी पार्क येथे चहाची टपरी आहे.

करण हा मंगळवारी (ता.९) सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास टपरीवर आला. त्याने दमबाजी करत टपरी चालवायची असेल तर मला दररोज ५०० रुपयांची खंडणी देण्याची मागणी तक्रारदार यांच्याकडे केली. पैसे न दिल्यास टपरी चालवून देणार नाही, असे म्हणत कामगारास शिवीगाळ केली. तर, त्याला हाताने मारहाणकरून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तक्रारदारांनी तक्रार करताच पोलिसांनी करण याला अटक केली. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक ए. आर. गांधले करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Raigad Women : 'लाडकी बहीण' योजनेतून तब्बल 50 हजार महिलांची नावं वगळली; 'ही' आहेत महत्त्वाची कारणं, यादीत तुमचं तर नाव नाही ना?

Jalgoan News: २५ वर्षीय विवाहितेचा प्रसूतीनंतर मृत्यू, पिंपळनेरमध्ये नातेवाईकांचे आंदोलन, डॉक्टरांवर गंभीर आरोप

Gold Rate Today : सोन्याने घेतली उसळी तर चांदी घसरली ! जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Iran US Conflict: पश्चिम आशियातील तेल निर्यात रोखू; नाकेबंदीनंतर इराणचा इशारा, अमेरिकेच्या हल्ल्यात सात जणांचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा सोनम वांगचुक यांना पाठिंबा

SCROLL FOR NEXT