water-tax
water-tax sakal
पुणे

पुणे : अमृततुल्यची पाणीपट्टी माफ करण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा

लॉकडाऊच्या काळात शहरातील अमृततुल्य चहाची दुकाने बंद असून देखील महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने या दुकानांना १४ महिन्यांची पाणीपट्टी भरण्याचे आदेश दिले आहेत.

पुणे - लॉकडाऊच्या (Lockdown) काळात शहरातील अमृततुल्य चहाची दुकाने (Tea Shop) बंद असून देखील महापालिकेच्या (Municipal) पाणी पुरवठा विभागाने या दुकानांना १४ महिन्यांची पाणीपट्टी (Water tax) भरण्याचे आदेश दिले आहेत. ही पाणीपट्टी अन्यायकारक असून, ती रद्द करण्याची मागणी अमृततुल्य व्यावसायिकांनी केली आहे.

लॉकडाऊनच्या काळात शहरातील सर्व दुकाने बंद होती, त्यामध्ये अमृततुल्य दुकानांचाही समावेश आहे. महापालिकेकडून अमृततुल्य चहा व्यावसायिकांना दर महिन्याला १ हजार ८० रुपये रुपये पाणी पट्टी आकारली जाते. मार्च २०२० महिन्यापासून लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर मे २०२१ या कालावधीपर्यंत कधी पूर्ण तर कधी अर्धा दिवस तर कधी सायंकाळी सात पर्यंत दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी होती. त्याचा परिणाम चहा विक्रीच्या व्यवसायावर झालेला आहे. असे असताना पाणी पुरवठा विभागाने मार्च २०२० ते मे २०२१ या १४ महिन्याच्या कालावधीतील पाणी पट्टी भरण्यासाठी अमृततुल्य व्यावसायिकांना बिल पाठविण्यात आले आहे.

त्यामुळे प्रत्येक व्यावसायिकास १५ हजार रुपयांचा भुर्दंड पडणार आहे, असे पुणे शहर अमृततुल्य व्यावसायिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित वोरा यांनी सांगितले.

ही पाणीपट्टी रद्द करावी अशी मागणी खासदार गिरीश बापट यांच्याकडे करण्यात आली आहेत. त्यांनीही पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांना यांना पत्र लिहून या विषयात लक्ष घालण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच असोसिएशनने देखील महापालिका आयुक्त, स्थायी समिती अध्यक्षांना पत्र लिहून पाणी पट्टी माफ करण्याची मागणी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSC Exam Result : बारावीचा निकाल २.१२ टक्क्यांनी वाढला; कोकण विभागाचा सर्वाधिक ९७.५१

Narendra Modi : ... तर नेहरूंनी आरक्षणच दिले नसते

Pune News : विशाल अग्रवालसह चार जणांना अटक

Azamgarh Loksabha Election : ‘सप’च्या बालेकिल्ल्यात दोन यादवांमध्ये लढाई; धर्मेंद्र यादव विरुद्ध दिनेशलाल निरहुआ

Milind Deora : उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेस पक्ष सोडला

SCROLL FOR NEXT