पुणे

आठपैकी केवळ तिघांचा मृत्यू डेंगीमुळे

CD

पुणे, ता. १५ : डेंगीमुळे शहरात यंदा तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोग्य विभागाच्या मृत्यू पडताळणी समितीने आठ संशयित मृत्यूंच्या वैद्यकीय कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर हा निष्कर्ष समोर आला असून, तिन्ही मृत रुग्ण पुण्याबाहेरील आहेत.
शहरात यंदा डेंगीचे आठ संशयित मृत्यू नोंदवले गेले होते. गेल्या महिन्यात १८ ऑक्टोबरला लोहगाव येथील ८ वर्षीय मुलीचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर नगरसेवकांनी आरोग्य विभागाला धारेवर धरले होते. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने आठही संशयित मृत्यूंची प्रकरणे तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीकडे पाठवली होती.
समितीने या प्रकरणांचा सखोल अभ्यास केला. त्यानुसार, पुण्यातील रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या रत्नागिरी, अहमदाबाद आणि पिंपरी-चिंचवड येथील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू केवळ डेंगीच्या गुंतागुंतीमुळे झाल्याचे निश्चित झाले आहे. उर्वरित पाच जणांना डेंगीमृत्यूच्या यादीतून वगळण्यात आले आहे. यातील तिघांना इतर सहव्याधी होत्या, तर दोघांची खात्रीशीर मानली जाणारी ‘एलायझा’ चाचणी निगेटिव्ह आली होती.

डेंगीमृत्यूच्या निकषांबाबत स्पष्टीकरण
लोहगाव येथील मुलीलाही इतर आरोग्यविषयक समस्या आणि सहव्याधी असल्याने तिचा मृत्यू केवळ डेंगीमुळे झाला नसल्याचे समितीने स्पष्ट केले आहे. एखाद्या रुग्णाला डेंगीची लागण झाली असली, तरी त्याचा मृत्यू इतर सहव्याधी किंवा डेंगीशी संबंध नसलेल्या कारणांनी झाल्यास तो डेंगीमृत्यू मानला जात नाही, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विदर्भात थंडीचा कडाका वाढला! तापमानात ५ अंशांची घसरण, पारा थेट १३ अंशांवर; नागपूरसह अनेक जिल्ह्यांत हुडहुडी

एसटी चालक-वाहकाचा मनमानी कारभार! विद्यार्थिनींना रात्री अंधारात अर्ध्या रस्त्यात उतरविलं, सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! ICC कडून २०३५ पर्यंतचं वेळापत्रक जाहीर; भारतात कधी होणार वर्ल्ड कप?

राज्यातील ३४ हजार न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर जाणार! मंगळवारपासून कामकाज ठप्प होणार? नेमक्या मागण्या काय?

वंदे भारत ट्रेनचे ब्रेक फेल, तरी ४६३ किमी धावली; रेल्वेच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT