Dengue sakal
पुणे

Dengue : पुण्यात वाढतोय डेंगीचा ताप

पुणे शहरात डेंगीचा ताप सातत्याने वाढत आहे. त्यात सर्वाधिक रुग्ण ढोले पाटील आणि औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आढळले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहरात डेंगीचा ताप सातत्याने वाढत आहे. त्यात सर्वाधिक रुग्ण ढोले पाटील आणि औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आढळले आहेत. या दोन भागांमध्ये शहरातील ३२ टक्के डेंगीचे रुग्ण आहेत, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

यावर्षी आतापर्यंत ८६ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी २८ (३२ टक्के) रुग्ण ढोले पाटील आणि औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयांतील आहेत. शहरात पावसाला सुरुवात झाली आणि डासांची पैदास वेगाने वाढली. १६ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये ऑगस्टमध्ये ४७ रुग्णांचे निदान झाले आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

शहरात प्रत्येक दिवशी सुमारे नवीन डेंगीच्या संशयित रुग्णांची भर पडल्याचे निरीक्षण सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी नोंदविले आहे.

रुग्ण का वाढताहेत?

साठलेल्या पावसाच्या पाण्यात डासांची पैदास होत आहे. त्यातील ‘एडिस इजिप्ती’ डासापासून डेंगी होतो. हा डास स्वच्छ पाण्यावर अंडी घालतो, त्यातून निर्माण होणाऱ्या डासांद्वारे आजाराचा प्रसार होतो.

आठ महिन्यांत ८६ रुग्ण

एक जानेवारी ते चार सप्टेंबरदरम्यान आतापर्यंत डेंगीचे निश्चित निदान झालेल्या ८६ रुग्णांची नोंद महापालिकेत झाली आहे. त्यापैकी सर्वाधिक रुग्ण ऑगस्टमध्ये (४७) आढळले आहेत. शहरात मे आणि जूनमध्ये पाऊस पडला नव्हता. त्यामुळे या दोन महिन्यांमध्ये एकाही रुग्णांची नोंद झाली नाही. मात्र, फेब्रुवारीमध्ये ११ पर्यंत रुग्णांची वाढ झाल्याचे निरीक्षण आरोग्य विभागाने नोंदविले आहे.

डेंगीला प्रतिबंधित करता येते. त्यासाठी डासोत्पत्तीची ठिकाणे नष्ट करणे आवश्यक आहे. तसेच ताप, थंडी, अंगदुखी, त्वचेवर पुरळ येणे अशा कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. तातडीने वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्या. कारण, ही लक्षणे डेंगीची असू शकतात.

- डॉ. अतुल कुलकर्णी, वैद्यकीय तज्ज्ञ

१ जानेवारी ते ४ सप्टेंबरपर्यंतचे रुग्ण

क्षेत्रीय कार्यालय डेंगीचे रुग्ण

ढोले पाटील रस्ता - १६

औंध-बाणेर - १२

येरवडा-कळस धानोरी - १०

कसबा-विश्रामबाग - १०

हडपसर-मुंढवा - ९

घोले रस्ता-शिवाजीनगर - ७

नगर रस्ता-वडगाव शेरी - ५

बिबवेवाडी - ०

भवानी पेठ - ५

वारजे-कर्वेनगर - ४

कोंढवा-येवलेवाडी - २

वानवडी-रामटेकडी - २

टिळक रस्ता-सिंहगड रस्ता - १

कोथरूड - १

केशवनगर - १

धनकवडी-सहकारनगर - १

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uttar Pradesh :  कर विभागात फील्डवर ‘अशा’ अधिकाऱ्यांचीच करा भरती; CM योगी आदित्यनाथ यांनी दिले कडक आदेश

Uttrakhand : उत्तराखंडची ही ठिकाणं पहाल तर स्वित्झर्लंड विसरून जाल; हे पाच सुंदर लोकेशन्स एकदा पहायलाच हवेत

Crime News : जळगाव-अजिंठा रोडवर गोळीबार: कुसुंबा गावात ८ ते १० जणांच्या टोळक्याची दहशत; दुचाकी दगडांनी ठेचली

Malegaon Nagarpanchyat Election : माळेगाव नगराध्यक्ष पदाचा पहिला मान ओबीसी महिलेला

Santosh Deshmukh Case: ''आरोपींच्या विरोधात शब्दही न बोलणारे लोकप्रतिनिधी...'', धनंजय देशमुखांचा मुंडेंवर घणाघात

SCROLL FOR NEXT