पुणे

विकासनिधीसाठी जिल्हा परिषद सदस्यांची मुंबईवारी

CD

पुणे, ता. २५ : जिल्हा परिषदेच्या काही सदस्यांनी मंगळवारी मुंबईत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन बांधकाम समितीच्या कामांसाठी पुरेसा विकास निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी सदस्यांनी या वेळी सविस्तर चर्चा केली.
जिल्हा परिषदेतील विविध विकासकामे, निधीचे नियोजन आणि प्रलंबित प्रश्‍नांबाबत सदस्यांकडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. स्थानिक पातळीवरील कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असून, उपलब्ध तरतुदीतून कामांना प्राधान्य देण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. या पार्श्वभूमीवर, सदस्यांनी थेट मुंबईत जाऊन वरिष्ठ पातळीवर आपल्या मागण्या मांडल्या. या वेळी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांचीही सदस्यांनी भेट घेऊन चर्चा केली.
एकाच वेळी अनेक सदस्यांनी मुंबई गाठल्याने जिल्हा परिषद वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. या भेटी केवळ विकासकामांसाठी असल्याचे सदस्यांकडून सांगण्यात येत असले, तरी याला राजकीय किनार असल्याचीही चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते श्रीमंत ढोले म्हणाले, ‘‘सदस्यांनी भेट घेतली ही बाब खरी आहे. सदस्यांची काही वैयक्तिक कामेही असतात, त्यासाठी ते मुंबईला गेले असतील.’’
------------------------
प्रशासकीय हालचालींना वेग
जिल्हा परिषदेतील प्रलंबित प्रश्‍न आणि विकासकामांसाठी वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्याने प्रशासकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. या भेटींमुळे ग्रामीण भागातील विकासकामांना किती निधी मिळणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

Pune Crime : अल्पवयीन नातीवर लैंगिक अत्याचार; आजोबाला जन्मठेप

Mumbai Metro Viral News: मुंबई मेट्रोत मांजरीला लागली 'नोकरी'! MMMOCL ने दिलं Chief Feline Officer पद, ड्युटीही ठरवली

Hospital Fire Audit : आरोग्य विभागाचे वरातीमागून घोडे; अमरावती दुर्घटनेनंतर राज्यातील रुग्णालयांचे फायर ऑडिट

Marathi News Live Updates : एका व्यावसायिक इमारतीत आग

SCROLL FOR NEXT