Accused Arrested sakal
पुणे

Pune Crime : पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांवर हल्ला करत रोकड लांबवणारे आरोपी गजाआड

डी.के.डी. पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना कुऱ्हाडीचे वार करत गंभीर जखमी करून जबरी चोरी करणाऱ्या आरोपीच्या सिंहगड रोड पोलिसांनी मुसक्या आवळल्या.

विठ्ठल तांबे

धायरी - सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीतील भूमकर चौक येथील डी.के.डी. पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना कुऱ्हाडीचे वार करत गंभीर जखमी करून जबरी चोरी करणाऱ्या आरोपीच्या सिंहगड रोड पोलिसांनी मुसक्या आवळल्या. दहा महिन्यांपूर्वी हा गुन्हा घडला होता.

ऋषिकेश रमेश कदम (वय २३ वर्षे रामाऊली कृपा बिल्डींग,चरवड वस्ती, वडगाव) असे आरोपीचे नाव आहे. त्याने सांगितलेल्या माहितीनुसार मानस सिताराम पिसे (वय २३, पठार वस्ती, वडगाव) याला भूम (जि. उस्मानाबाद ) येथे जाऊन पकडण्यात आले.

गेल्या वर्षी २३ आॅगस्ट या पहाटे दीड ते पावणेदोनच्या दरम्यान दोन जणांनी पेट्रोल पंपावरील कामगारांना गंभीर जखमी करून २०,४०० रुपये चोरी करून नेले होते. या गुन्हयातील दोन आरोपींचा सिंहगड रोड पोलीस स्टेशन पोलीस अधिकारी व अंमलदार शोध घेत होते.

परिसरामधील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करूनही आरोपींचा काही धागादोरा हाती येत नव्हता. तब्बल १० महिन्या नंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आबा उतेकर व क्षीरसागर, ओलेकर या पोलीस कर्मचाऱ्यांना १४ मे रोजी माहिती मिळाली की पेट्रोल पंपावर रात्रीच्या वेळी जबरदस्तीने घुसून मारहाण करुन चोरी करणाऱ्या दोघांपैकी एक हिंगणे चौक येथे आला असून हिरव्या रंगाचा फुल शर्ट व चॉकलेटी रंगाची पॅन्ट घातलेली आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निकम यांना ही माहिती कळविली असता त्यांनी वरिष्ठांना सांगितली. पोलिसांना पाहून संशयित गडबडीत पळून जावू लागला. त्यास पकडून चौकशी करण्यात आली व अटक करून साथीदाराचा माग काढण्यात आला. दोघांना अटक करुन न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक, पश्चिम प्रादेशिक विभाग सह आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपआयुक्त परीमंडळ -३ सुहेल शर्मा, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन , पोलीस निरीक्षक (गुन्हे) जयंत राजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम, पोलीस अंमलदार, आबा उत्तेकर, संजय शिंदे, शिवाजी क्षिरसागर, राहुल ओलेकर, अमित बोडरे, राजाभाऊ वेगरे, विकास बांदल, विकास पांडुळे, अमोल पाटील, सागर शेंडगे, देवा चव्हाण, स्वप्नील मगर, अविनाश कोंडे, दक्ष पाटील यांच्या पथकाचा त्यात समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT