bridge
bridge sakal
पुणे

नवीन पूल झाला पण जुना पूल तसाच असल्याने पुराचा धोका कायम

विठ्ठल तांबे

धायरी : अतिवृष्टीमुळे सप्टेंबर २०१९ मध्ये वडगाव खुर्द येथील प्रयेजा सिटी जवळील ओढ्यावरील पूल मागच्या वर्षी पूर आल्याने वाहून गेला होता. प्रयेजा सिटीकडून सनसिटी व वारजेकडे जाणाऱ्या मुबंई बंगळूर महामार्गावर जाण्यासाठी सर्व्हिस रस्ता म्हणून या पुलाचा वापर केला जातो. काही दिवसांपूर्वी या ओढ्यावर नवीन पूल झाला पण जुना पूल व राडारोडा तसाच असल्याने पुराचा धोका कायम असल्याचे दिसून आले आहे.

अतिवृष्टीमुळे, प्रयेजा सिटी सनसिटी रस्त्याला जोडणारा पूल व रस्ता वाहून गेला होता. या कामासाठी एक कोटी साठ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती.त्यानंतर पुलाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. महामार्गावरून वडगाव, धायरी व पुढे नांदेड व ग्रामीण भागाकडे जातो.यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते तसेच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील होत असते. तसेच पुलाच्या एक बाजू रस्ता अरुंद असल्याने देखील वाहतूक कोंडी मध्ये मोठ्या प्रमाणावर भर पडताना दिसत आहे

जुन्या पुलामुळे ओढयाच्या प्रवाह सोबत वाहून आलेला कचरा पुलाला व मोऱ्याना अडकून पाण्याचा प्रवाह थांबला जातो त्यामुळे जुन्या आणि नवीन पुलाला पूरस्थिती निर्माण झाल्या नंतर धोका निर्माण होऊ शकतो.आणि मोठ्या प्रमाणात अपघात होऊ शकतात.

     "महानगरपालिका नागरिकांचा पैसे अर्धवट कामे करून वाया घालवते की काय असे या जुन्या पुलाच्या कामावरून दिसून येत आहे.जुन्या पुला मुळे पूरस्थिती निर्माण झाली तर नवीन पुलाला धोका होऊ शकतो.तो काढून टाकणे गरजेचे आहे. मनपाने वेळीच योग्य कारवाई करणे गरजेचे आहे".

-राहुल कुलकर्णी (नागरिक)

नवीन पुलाला जुन्या पुलाला मुळे धोका होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कारण सप्टेंबर २०१९ मध्ये पुरामुळे जुना पूल वाहून गेला होता त्यामुळे या पुलावरील वाहतूक अनेक वर्षे बंद होती. मनपाने वेळेत सावधानता बाळगावी..

- आशा पाटील (स्थानिक रहिवासी)

"जुना पूल काढण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे परवानगी मागितली आहे. तसेच पूल काढण्यासाठी मनपाकडे टेंडरची प्रक्रिया सुरू असून लवकरच पूल काढण्याचे काम सूर होईल"..

- विठ्ठल इंगोले (अभियंता पथ विभाग)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT