डिंभे  sakal
पुणे

Pune : डिंभे धरणातून 22000 क्युसेक विसर्ग

सार्वजनिक बांधकाम विभाग व तहसील कार्यालय सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून

सकाळ वृत्तसेवा

आंबेगाव : तालुक्याच्या आदिवासी भागातील आहूपे ,भीमाशंकर व पाटण खोऱ्यात मुसळधार पावसामुळे घोड नदी व बुब्रा नदीला पूर आला आहे. या पुरात माळीन फाट्यावर आंबडे येथील नागरीक चंद्रकांत काळू असवले ( वय 48 वर्ष) हे पुरात वाहून गेले आहेत. त्यांचा दुपारपर्यंत शोध लागला नाही. डिंभे धरणातून पाचही दरवाजातून 22000 क्युसेस ने घोड नदी पात्रात दुपारी एक वाजल्या पासून पाणी सोडण्यात येत आहे.

गेली दोन दिवस मुसळधार पावसामुळे आदिवासी भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. ओढे नाल्यांना पूर आले आहेत .भात खाचरे तुडुंब भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी शेतीचे बांध वाहून गेले आहेत. घोड नदी व बुब्रा नदीला पूर आल्यामुळे त्या दुथडी भरून वाहत आहेत. सध्या धरणात 22 हजार क्युसेसनी पाण्याची आवक सुरू असून धरणातून तेवढेच पाणी घोड नदीपात्रात सोडले जात आहे. सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी सकाळपासूनच गावागावात जनजागृती करण्यासाठी पोलीस पाटील व नागरिकांची मदत घेतली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग व तहसील कार्यालय सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. नागरिकांनी नदी काठावर जाऊ नये. असे आवाहन तहसीलदार रमा जोशी व गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी केले आहे .धरणात पाण्याची आवक वाढली तर नदीपात्रात जास्त पाणी सोडले जाईल. नागरिकांनी काळजी घ्यावी. असे आवाहन डिंभे प्रकल्पाचे उपअभियंता तानाजी चिखले यांनी केले आहे.

डिंभे धरण शंभर टक्के भरले असून धरण साठ्यात 12.50 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी आठ वाजेपर्यंत धरण परिसरात 18 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे .तर आज पर्यंत एकूण १२68 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. गेल्या वर्षीपेक्षा जवळजवळ ३५० मिलिमीटर पाऊस जास्त झाल्याची आकडेवारीवरून दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्टार प्रवाहसाठी मालिका नव्हे प्रोडक्शन हाउस महत्वाचं; प्राइम टाइमसाठी टॉप ५ मधली मालिका करणार बंद, नेटकरी म्हणतात- आताच तर...

Marbat 2025: सगळं अशुभ,अमंगळ घेऊन जा..गे मारबत! कोण होत्या राणी बाकाबाई भोसले ज्यांच्यामुळे नागपुरात सुरू झाला अनोखा मारबत?

खुशखबर! Oneplus 13 स्मार्टफोनचा दर उतरला; मिळतोय हजारो रुपयांचा डिस्काउंट; 24GB रॅमचा मोबाईल किंमत फक्त...

Asia Cup 2025: श्रेयस अय्यरला टीम इंडियात संधी मिळाली असती, पण कोणाचा 'हट्ट' नडला? इतर संघांपेक्षा वेगळं करण्यासाठी गेले अन्...

कोट्यवधींचा मालक असलेला गोविंदा सुनीतासोबत घटस्फोट झाल्यास किती देणार पोटगी? वेगळं होण्याचं नक्की कारण काय?

SCROLL FOR NEXT