Corona_Patients 
पुणे

पुणे शहरात पुन्हा वाढ; जिल्ह्यात आढळले २७००हून अधिक नवे कोरोना रुग्ण!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात मिळून पुणे जिल्ह्यात रविवारी (ता.२६) दिवसभरात आणखी २ हजार ७७३ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पुणे शहरातील १ हजार ८७४ रुग्णांचा समावेश आहे. शनिवारच्या तुलनेत रविवारी पुणे शहरातील रुग्णांमध्ये ३९७ ने वाढ झाली आहे. दरम्यान, दिवसभरात ३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

पुणे शहरात शनिवारी १ हजार ४७९ नवे रुग्ण सापडले होते. त्यात रविवारी आणखी ३९७ भर पडली आहे. त्यामुळे ही संख्या १ हजार ८७४ वर पोहोचली आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ६९ हजार ७३८, तर एकूण मृत्युंची संख्या १ हजार ६९९ झाली आहे. 

पिंपरी-चिंचवडमध्ये रविवारी ६६३, जिल्हा परिषद क्षेत्रात १५६ आणि नगरपालिका आणि कॅंटोन्मेंट बोर्डात मिळून ८० नवे रुग्ण आढळून आले आहेत. शनिवारच्या आकडेवारीच्या तुलनेत पिंपरी चिंचवड, जिल्हा परिषद कार्यक्षेत्र, नगरपालिका आणि कॅंटोन्मेंट बोर्डातील रुग्णांच्या संख्येत रविवारी घट झाली आहे. 

रविवारी दिवसभरात मृत्यू पावलेल्यांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक १४ रुग्णांचा समावेश आहे. याशिवाय पिंपरी चिंचवडमधील १०, जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ८ आणि नगरपालिका तसेच कॅंटोन्मेंट बोर्डातील मिळून पाच जणांचा समावेश आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Aarti: यंदा गणपतीच्या आरतीसाठी पुस्तक शोधण्याची गरज नाही; सगळ्या आरत्या मिळवा एकाच ठिकाणी, एका क्लिकवर!

Savings: 10 रुपयांची बचत करून पती-पत्नी वर्षभरात करतील 1 लाखांचा फंड! ना SIP, ना शेअर मार्केट; काय आहे हे चॅलेंज?

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरण! आमदारपुत्र रोहित गावितला चार दिवसांची पोलीस कोठडी; काल मीरा रोडवरून घेतले होते ताब्यात

Girna Dam Water Storage : नाशिक अन् गुजरातच्या पावसाने गिरणा धरण फुल्ल! 21 हजार हेक्टर शेती फुलणार; काय आहे ताजी स्थिती?

Marathi News Live Updates : पुढील २४ तास विदर्भात पावसाची शक्यता,३ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT