Mahavikas Aghadi sakal
पुणे

Pune Apmc Result : पुणे जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये महाविकास आघाडीचा बोलबाला

पुणे जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे.

पुणे - पुणे जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. शनिवारी (ता. २९) निकाल जाहीर झालेल्या जिल्ह्यातील नऊपैकी सर्वाधिक तीन बाजार समित्यांवर महाविकास आघाडीने सत्ता काबीज केली आहे. यामध्ये नीरा (ता. पुरंदर), मंचर (ता. आंबेगाव) आणि मावळ या तीन समित्यांचा समावेश आहे. उर्वरित सहापैकी राष्ट्रवादी काँग्रेसने तीन बाजार समित्यांमध्ये एकहाती सत्ता मिळविली आहे. कॉंग्रेसने एका बाजार समितीवर तर, एका बाजार समितीवर भाजप पुरस्कृत सर्वपक्षीय पॅनेलने सत्ता मिळविली आहे. दौंड बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपला बरोबर निम्म्या-निम्म्या (फिफ्टी-फिफ्टी) जागांवर विजय मिळाला आहे.

जिल्ह्यातील दहा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे. यापैकी नऊ बाजार समित्यांच्या निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. उर्वरित एक म्हणजेच जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी येत्या रविवारी (ता.३०) मतदान होणार आहे. नऊपैकी बारामती, इंदापूर आणि खेड या तीन बाजार समित्यांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने एकहाती सत्ता काबीज केली आहे. कॉंग्रेसने भोरमध्ये सर्वच्या सर्व जागा जिंकत एकहाती सत्ता मिळविली आहे. या बाजार समितीच्या निवडणुकीत विरोधी पक्षांना भोपळाही फोडता आलेली नाही. दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक खूपच चुरशीची झाल्याचे निवडणूक निकालावरून स्पष्ट झाले आहे. येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी आमदार रमेश थोरात आणि भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या पॅनेलमध्ये चुरशीची निवडणूक होऊन, या दोन्ही पक्षांनी प्रत्येकी निम्म्या-निम्म्या जागांवर यश मिळविले आहे.

पुणे बाजार समितीत भाजप पुरस्कृत पॅनेल विजयी

दरम्यान, तब्बल दोन दशकांच्या खंडानंतर झालेल्या पुणे (हवेली) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत सर्वपक्षीय पॅनेलने सत्ता मिळविली आहे. या बाजार समितीवर गेल्या २० वर्षापासून प्रशासकराज होते. त्यामुळे दोन दशकांच्या खंडानंतर यंदा पहिल्यांदाच या बाजार समितीची निवडणूक झाली आहे. यामध्ये १८ पैकी १३ जागांवर भाजप, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), शिवसेना (शिंदे गट)आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर गटाच्या संयुक्त पॅनेलने विजय मिळविला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. तीन जागांवर अन्य उमेदवार विजयी झाले आहेत.

बाजार समिती निकाल दृष्टीक्षेपात

- निकाल जाहीर झालेल्या बाजार समित्या --- ०९

- नऊ बाजार समित्यांतील संचालकांची संख्या --- १६०

- महाविकास आघाडीकडे आलेल्या समित्या --- ०३

- राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आलेल्या एकूण समित्या --- ०३

- कॉंग्रेसच्या ताब्यात आलेल्या --- ०१

- भाजप पुरस्कृत सर्वपक्षीय पॅनेलची सत्ता --- ०१

- राष्ट्रवादी आणि भाजप समान जागा असलेल्या समित्या --- ०१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

४ वर्षात १११ खासदार-आमदारांचे पक्षांतर, सर्वाधिक इनकमिंग झालेला पक्ष भाजप नव्हे, भाजपात २९ जणांचा प्रवेश

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत वाघाचे अवयव आणि २ खवले मांजर जप्त

Vastu Tips: पिंपळ, तुळस की मुख्य दार? पितृपक्षात संध्याकाळी का अन् कुठे लावावा दिवा? वास्तुनुसार जाणून घ्या योग्य दिशा अन् फायदे!

Pune Drought: पावसाअभावी भातपिके वाळू लागली; मुळशी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी शेतकरी आक्रमक

Traditional Farming: ट्रॅक्टरच्या युगातही बैलजोडीचा ध्यास; २२ वर्षांच्या ‘राजा’नंतर खंडेराव बकाल यांनी पुन्हा जपला शेतीचा पारंपरिक वारसा

SCROLL FOR NEXT