Aundh Hospital Pune News
Aundh Hospital Pune News sakal
पुणे

Shivsena Agitation : जिल्हा रुग्णालय खासगीकरणाच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

पुणे - औंध येथील जिल्हा रुग्णालयाच्या खासगीकरणाच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्यावतीने बुधवारी (ता.२४) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्याच्या आरोग्य विभागाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

या जिल्हा रुग्णालयात सध्या अद्ययावत सुविधा उपलब्ध असताना राज्यातील काही शिक्षणसम्राट, विकासक (बिल्डर) आणि लोकप्रतिनिधींचा या रुग्णालयाच्या ८५ एकर भूखंडावर डोळा आहे. त्यामुळेच राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी मंत्रालयात या रुग्णालयाचा भूखंड हा पीपीपी तत्त्वावर विकसित करण्यासाठी आरोग्य सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठक घेतल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

जिल्हा रूग्णालयात नागरिकांना मोफत आरोग्य सेवा देणे, हे सरकारचे कर्तव्यच आहे. नागरिकांना मोफत आरोग्य सेवा कशा मिळतील, यावर लक्ष देण्याऐवजी उलट आरोग्यमंत्र्यांनी या रुग्णालयाचे खासगीकरण करण्याचा घाट घातला असल्याचे या पक्षाचे पुणे शहरप्रमुख संजय मोरे आणि गजानन थरकुडे यांनी यावेळी सांगितले.

आरोग्य खात्यात राज्यात पीपीपी मॉडेल यशस्वी झालेले नाही. त्यामुळे हा प्रयत्न म्हणजे कंत्राटदारांचा खिसा भरण्याचा प्रकार आहे. आधी पीपीपी मॉडेल आणून शिरकाव करायचा आणि नंतर येथील सरकारी जागादेखील अशाच योजनांच्या माध्यमातून हडप करायची असा हा डाव आहे. त्यामुळे, सावंत यांनी याबाबत तत्काळ स्पष्टीकरण द्यावे आणि येथील पीपीपी मॉडेल मागे घ्यावे, अशी मागणी यावेळी कऱण्यात आली.

पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात बाळा ओसवाल,भरत कुंभारकर,शेखर जावळे, उमेश गालिंदे, अनंत घरत, उत्तम भुजबळ, नितीन वाघ, संजय वाल्हेकर, सनी गवते, युवराज पारिख, महेश पोकळे, शीतल जाधव, मकरंद पेठकर, चंदन साळुंके, नंदू येवले, संदीप गायकवाड, संतोष शेलार, योगेश पवार,अतुल गोंदकर, विजय नायर, रमेश क्षीरसागर, विलास सोनावणे, आकाश रेणुसे, रणजित शिंदे, गोविंद निंबाळकर, सूरज मोराळे, संतोष भुतकर, नागेश खडके, देवेंद्र भाट आदी प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT