पुणे

आपटी सोसायटीत प्रतिनिधी निवडीवरून वाद

CD

भोर, ता. १४ : पुणे जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रतिनिधीसाठी आपटी (ता. भोर) येथील विकास सोसायटीच्या रविवारी (ता. १३) झालेल्या बैठकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमधील वाद टोकाला गेला. बैठकीस उपस्थित राहण्यापासून संचालकांना प्रतिबंध करण्यात आला. त्यामुळे दोन्हीही पक्षांच्या संचालकांनी एकमेकांविरोधात भोर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
आपटी सोसायटीचे अध्यक्ष लक्ष्मण पारठे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी सकाळी ११ वाजता कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीस सचिव विठ्ठल पराठे हे एकटेच उपस्थित होते. बैठकीस एकही संचालक उपस्थित राहिला नाही. मात्र, काही वेळाने अध्यक्षांनी दरवाजामधूनच सचिवांना बैठकीचा अहवाल मागितला आणि तेही निघून गेले.
दरम्यान, बैठकीपूर्वी बैठकीत निघालेल्या संचालकांची वाहने अडवून त्यांना बैठकीस वेळत पोचू नये, यासाठी रोखण्यात आले. १३ संचालक असलेल्या आपटी विकास सोसायटीतील २ संचालक मयत आहेत. त्यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्षांसह ११ जण उपस्थित राहणार होते. परंतु, बैठकीस एकही संचालक उपस्थित राहिला नाही. त्यामुळे कोरमअभावी बैठक झाली नाही.
याबाबत संचालक दत्तात्रेय परखंदे आणि विनोद खुटवड यांनी भोर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल केल्या. पहिली फिर्याद दत्तात्रेय परखंदे यांनी दाखल केली. यामध्ये रविवारी सकाळी पावणेअकरा वाजता संचालक अप्पा खुटवड (रा. नांदगाव, ता. भोर) आणि जयवंत चव्हाण (रा. हातनोशी, रामोशी वाडी, ता. भोर) यांनी इतर दोन जणांसह त्यांच्या मोटारीला मोटार आडवी लावून रोखले. मोटारीतून जाणारे संचालक जगन्नाथ पारठे, लक्ष्मण गायकवाड, वसंत कुडले, जनाबाई पारठे व सिंधु मादगुडे यांना बैठकीस जाण्यापासून रोखले. एक तासानंतर पावणेबारा वाजता त्यांना सोडून देण्यात आले, अशी फिर्याद दिली. याबाबत पोलिस हवालदार सुशांत पिसाळ पुढील तपास करीत आहेत.
दुसरी फिर्याद विनोद खुटवड यांनी दिली. यामध्ये नितीन थोपटे (रा. खानापूर ता. भोर) आणि दत्तात्रेय परखंदे (रा. निगुडघर, ता. भोर) यांनी इतर दोन जणांसह मोटार आडवी लावून त्यांना आणि त्यांच्या वडिलांना दमदाटी केली, अशी फिर्याद दिली. याबाबत पोलिस हवालदार वर्षा भोसले पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Interesting Money Story: कुत्र्याला फिरवायला गेले अन् नशीबच पालटलं! ना लॉटरी, ना वारसा... एका क्षणात झाले करोडपती; नेमकं काय घडलं?

अंकिता वालावलकरने गणेशोत्सवादिवशीच दिली गुडन्यूज, मुंबईत घेतलं स्वतःचं घर; कुठे आहे तिचा २ बीएचके? म्हणते- सध्या इंटेरिअर...

Nirgudsar Theft : बंद घरावर चोरट्यांचा डल्ला; २८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि १५ हजार रुपये रोख रक्कम नेली चोरून

दगडूशेठ बाप्पाला हे नाव कसं मिळालं? जाणून घ्या दगडूशेठ हलवाईंची कहाणी

TMC rebels join BJP: 'तृणमूल'चे १७ बंडखोर खासदार भाजपच्या वाटेवर? NCPI नेत्याचं धक्कादायक विधान

SCROLL FOR NEXT