Dattatray Harshwardhan and Appasaheb Sakal
पुणे

पुणे जिल्हा बॅंकेची इंदापूर तालुक्याची निवडणूक चुरशीची की बिनविरोध?

इंदापूर तालुक्यामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची पंचवार्षिक निवडणूक चुरशीची होणार की गतवर्षी सारखी बिनविरोध होणार याकडे जिल्हाचे लक्ष लागले आहे.

राजकुमार थोरात

वालचंदनगर - इंदापूर तालुक्यामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची पंचवार्षिक निवडणूक चुरशीची होणार की गतवर्षी सारखी बिनविरोध होणार याकडे जिल्हाचे लक्ष लागले आहे.

इंदापूर तालुक्याचे राजकारण राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या भोवतीच फिरत असते. जिल्हा बँकेच्या 'अ' वर्गातील गेल्या पंचवार्षिक च्या निवडणुक इंदापूर तालुक्यामध्ये बिनविरोध झाली होती. बॅंकेचे विद्यमान संचालक आप्पासाहेब जगदाळे हे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षामधून बिनविरोध निवडणूक आले होते.

२०१९ च्या विधानसभा निवडणूकीपूर्वी आप्पासाहेब जगदाळे यांनी भाजपचे विधानसभेचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांना पाठिंबा दिला होता. यानंतर तालुक्यामध्ये समीकरणे बदलेली आहे. सध्या विद्यमान संचालक जगदाळे यांची जिल्हाबॅंकेसाठी उमेदवारी निश्‍चित मानली जात आहे. जगदाळे यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस कुणाला उमेदवारी देणार याकडे लक्ष लागले आहे. इंदापूर तालुक्यामध्ये विविध कार्यकारी सेवा संस्थेचे १८३ प्रतिनिधी असून निवडणूकीमध्ये मतदान करणार आहेत. हर्षवर्धन पाटील व आप्पासाहेब जगदाळे एकत्र आल्यामुळे दोघांची जिल्हा बॅकेच्या निवडणूकीसाठी गेल्या पंचावार्षिक निवडणूकीपेक्षा निश्‍चित ताकद वाढली असून याचा फायदा पाटील व जगदाळे यांना होणार आहे.

इंदापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे व जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर असताना देखील इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याची व नीरा भिमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूकीकडे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाने पाठ फिरवल्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली होती. यावेळी जिल्हा बॅकेच्या निवडणूकीमध्ये राष्ट्रवादी काय भूमिका घेणार याकडे तालुक्यासह जिल्हाचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्याशी संपर्क केला असता पक्षामध्ये चर्चा करुन उमेदवार निश्‍चित करणार असल्याचे सांगितले. २९ नोव्हेंबर पासून जिल्हा बॅकेचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली आहे. २१ जागांसाठी २ जानेवारी २०२२ रोजी मतदान होणार असून जिल्हाचा राजकीय केंद्रबिंदू असणाऱ्या बॅकेच्या निवडणूकीमध्ये सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Latest Maharashtra News Live Updates: गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ; नाशिककरांना सतर्कतेचा इशारा

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

Ashadhi Wari 2025: विठूनामाने ‘प्रवरा संकुल’चे मैदान दुमदुमले; अश्‍वरिंगण सोहळा उत्साहात, १५ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

Raju Shetti: शेतकऱ्यांच्या थडग्यावर विकासाचे मनोरे नको: राजू शेट्टी; 'शक्तिपीठ'मुळे ५५ हजार शेतकरी देशोधडीला लागणार

SCROLL FOR NEXT