Lockdown Sakal
पुणे

भोरमध्ये 6 दिवसांचा कडक लॉकडाऊन

भोर - शहरातील कोरोनाग्रस्तांचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने शुक्रवार (ता.७) पहाटे १ वाजल्यापासून ते बुधवार (ता. १२) रात्री १२ वाजेपर्यत भोर शहरात कडक लॉकडाऊन घोषीत करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

भोर - शहरातील कोरोनाग्रस्तांचा (Corona Affected) प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने (Administrative) शुक्रवार (ता.७) पहाटे १ वाजल्यापासून ते बुधवार (ता. १२) रात्री १२ वाजेपर्यत भोर शहरात (Bhor City) कडक लॉकडाऊन (Lockdown) घोषीत करण्यात आला. प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव (Rajendrakumar Jadhav) यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी (ता.5) दुपारी येथील पंचायत समितीच्या तालुका प्रशासनाची बैठक (Meeting) झाली. त्यामध्ये भोर शहर व शहरालगतच्या भोलावडे गावात सहा दिवसांच्या कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. (Pune district Bhor 6 days strict lockdown News)

त्यानंतर प्रशासनाच्या वतीने प्रसिध्दीपत्रक काढून लॉकडाऊनचा निर्णय जाहीर करण्यात आला.या बैठकीस तहसीलदार अजित पाटील, गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत क-हाळे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी विजयकुमार थोरात, भोर व राजगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उपस्थित होते.

लॉकडाऊनच्या काळात फक्त रुग्णालये, औषधे व आरोग्य सुविधा कार्यरत राहणार आहेत. फक्त दूधवितरण सेवा ही सकाळी ७ ते ९ या वेळेतच सुरु राहणार आहे. भाजीविक्री, फळेविक्री व किराणा दुकानांसह इतर सर्व व्यवसाय बंद राहणार आहेत. लॉकडाऊनच्या काळात शहरात बाहेरच्या कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. यासाठी शहराच्या एसटी स्टँड, रामबाग नाका, चौपाटी व महाड नाका या चार ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी विजयकुमार थोरात यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : मध्य प्रदेशातील सांवर येथे भिंत कोसळून चार महिलांचा मृत्यू, पाच जण जखमी

Otur News : जुन्नर तालुक्यात प्रस्तावित कल्याण–लातूर जनकल्याण महामार्गाला तीव्र विरोध; शेतकरी आक्रमक, धरणे आंदोलनाला सुरुवात

SCROLL FOR NEXT