Pune_Collector 
पुणे

पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, जिल्हाधिकारी पोहोचले ऑक्सिजन उत्पादक कंपनीत

सकाळ वृत्तसेवा

पुणे : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठ्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ऑक्सिजन उत्पादक आणि पुरवठादार यांच्यासोबत बैठकीनंतर चाकण येथील एअर लिक्विड ऑक्सिजन कंपनीत जाऊन आढावा घेतला. 

कोविड रुग्णालये आणि हेल्थ सेंटरमधील ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. कोरोना बाधित रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी उत्पादकांनी ऑक्सिजनची निर्मिती पूर्ण क्षमतेने करण्याबरोबरच पुरवठा सुरळीत ठेवावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या.

सद्यस्थितीत पुणे जिल्ह्यात १३५ मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी असून, उत्पादकांकडे ७९० मेट्रिक टन ऑक्सिजन साठा शिल्लक आहे. त्यामुळे सध्यातरी ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही. परंतु पुण्यासह राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढत्या कोरोना रुग्णांना आवश्यक तेवढा ऑक्सिजन पुरवठा होण्यासाठी उत्पादकांनी पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनची निर्मिती करावी. जेणेकरुन भविष्यात ऑक्सिजनचा तुटवडा पडणार नाही. याबाबत डॉ. देशमुख यांनी उत्पादकांच्या अडचणी जाणून उपाययोजनांबाबत चर्चा केली. 

चाकण येथील एअर लिक्विड कंपनीत दररोज सर्वाधिक १२० टन ऑक्सिजन निर्मितीची क्षमता आहे. या कंपनीत सध्या पूर्ण क्षमतेने उत्पादन घेतले जात आहे. तसेच, आवश्यक प्रमाणात पुरवठा करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही. 
- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी 

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Samman Nidhi: दिवाळीपूर्वी पीएम किसानचे २,००० रुपये मिळणार शेतकऱ्यांना मिळणार का? २४व्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट

Shark Tank USA: भारतीय तरुणाचा अमेरिकेत डंका! फक्त 2 चमच्यांच्या आयडियासाठी मिळाली ₹3.3 कोटींची ऑफर

Asian Para Games : नाशिकच्या Dilip Gavitची 'सुवर्ण' धाव! सिमरनने स्पर्धा विक्रमासह जिंकले गोल्ड; भारताचे पदकांचे अर्धशतक...

Latest Marathi News Live Update : पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणूक, मतदानासाठी कर्मचाऱ्यांना चार तासांची विशेष सवलत

SA vs AUS 2nd Test : दक्षिण आफ्रिकेने 'फास' आवळला! रबाडाच्या 154.5 kph वेगाच्या चेंडूने हेड हडबडला... यान्सेनने करेक्ट कार्यक्रम केला

SCROLL FOR NEXT