Chandrakant Patil sakal
पुणे

Chandrakant Patil : बांधकाम विभागाअंतर्गत ४६ हजार १०९ कोटी रुपयांची विकासकामे सुरू

पुणे जिल्ह्यात बांधकाम विभागांतर्गत ४६ हजार १०९ कोटी रुपयांची विकासकामे सुरू असल्याचे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

प्रताप भोईटे

पुणे जिल्ह्यात बांधकाम विभागांतर्गत ४६ हजार १०९ कोटी रुपयांची विकासकामे सुरू असल्याचे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

न्हावरे - पुणे जिल्ह्यात बांधकाम विभागांतर्गत ४६ हजार १०९ कोटी रुपयांची विकासकामे सुरू असल्याचे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

न्हावरे (ता. शिरूर) येथे राष्ट्रीय महामार्ग न्हावरे ते चौफुला (एनएच ५४८ डीजी) या ३०४ कोटी रुपये किंमतीच्या रस्त्याच्या कामाचे भुमिपूजन जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

पाटील पुढे बोलताना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा सर्वंकष आणि सर्वसमावेशक विकास घडवून आणला असून विकासकामातील विस्कळीतपणा दूर करून त्यामध्ये शिस्त आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. दरम्यान केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी पूर्ण ताकदीने राष्ट्रीय महामार्गाची व विविध रस्त्याची कामे पूर्ण करून देशाला खऱ्या अर्थाने विकासाचा मार्ग दाखवला आहे. या परिसरातील रस्त्यांची कामे बऱ्यापैकी मार्गी लागली असून, ग्रामस्थांनी रस्त्यांच्या कामांना अडथळा आणू नये ज्यांचे नुकसान झाले असेल त्याबाबत सकारात्मक विचार करून योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल.

न्हावरे येथील मल्लिकार्जुन मंदिराचा तिर्थक्षेत्र विकास निधी, मारुती मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी निधी, ग्राम अभ्यासिकेसाठी पुस्तके, यासारख्या मागण्या तात्काळ पूर्ण करण्यात येतील तसेच न्हावरे ग्रामीण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा, न्हावरे येथे सबरजिस्टर कार्यालय, पोलिस स्टेशन, मंडल कार्यालयाची इमारत, पाणी विजेचे प्रश्न व बिबट्यापासून शेतकरी वर्गाला होत असलेला प्रादुर्भाव यासंदर्भात माहिती घेऊन लोकहित डोळ्यासमोर ठेवून हे ही प्रश्न तातडीने मार्गी लावण्यात येतील असेही चंद्रकांत पाटील यांनी आवर्जून यावेळी सांगितले.

गेल्या अडीच वर्षात राज्यात व या भागात विकासाचा अनुशेष राहिला आहे. तो भरून काढण्याचे काम शिंदे फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार निश्चितपणे करत असून आपणही शिरूर तालुक्यातील सर्वसामान्याचे प्रश्न सोडविण्याचे काम प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे करत असल्याचे आमदार राहुल कुल यांनी यावेळी सांगितले.

यावेळी भाजपाचे युवा नेते राजेंद्र कोरेकर यांनी प्रास्ताविक भाषणात शिरूर तालुक्याच्या पूर्वभागातील महत्त्वाच्या विविध विकास कामाबाबत मागणी करून ही विकासकामे लवकर पूर्ण व्हावीत यासाठी आग्रही भूमिका मांडली.

याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, माजी जिल्हा परिषद सदस्य जयश्री पलांडे, राहुल पाचर्णे, सुभाष कांडगे, तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे, भगवान शेळके, सतिश पाचंगे, वैजयंती चव्हाण, दिनेश दरेकर, धर्मेंद्र खांडरे, नितीन खंडागळे, रामकृष्ण बिडगर, शहाजी जाधव, कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे, कमल कोकडे, कविता बिडगर, जयवंत कोकडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपा व्यापारी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष कांडगे यांनी केले प्रास्ताविक युवानेते राजेंद्र कोरेकर यांनी केले तर आभार दिनेश दरेकर यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दसऱ्यानंतर मुंबईत महत्त्वाची बैठक; पगारवाढ आणि DAबाबत काय चर्चा होणार?

VIDEO: दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर; महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

Masur Fox Attack: मसूरमध्ये कोल्ह्यांची दहशत! वृद्धासह चिमुकली, महिला आणि शेतकऱ्यावर हल्ले

Latest Marathi News Live Update : समृद्धी महामार्गावर ट्रकला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला आग

SCROLL FOR NEXT