पुणे

झेडपीकडून कृती आराखड्यांत बदल

CD

पुणे, ता. १३ : पुणे जिल्हा परिषदेला १५व्या वित्त आयोगातून मिळालेल्या निधीच्या खर्चासाठी मंजूर केलेले मागील चार वर्षांचे कृती आराखडे बदलणार आहेत. स्थानिक गरजा, प्राधान्यक्रम आणि रखडलेल्या कामांचा विचार करून आराखड्यांमध्ये बदल करण्यास जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने बुधवारी (ता. १३) मंजुरी दिली. या बदलांसाठी विभागीय आयुक्तांच्या मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.
जिल्हा नियोजन समितीची बैठक येत्या शुक्रवारी (ता. १५) आयोजित केली असून, त्यापूर्वी सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी देण्यासाठी जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेत हा प्रारूप आराखडा मंजूर करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, सभापती दीपाली हुलावळे, अंकिता पाटील, जितेंद्र बडेकर व अमोल नलावडे, विभागप्रमुख आदी उपस्थित होते.
प्रारूप आराखड्याच्या मंजुरीनंतर वित्त आयोगाच्या विकास आराखड्यांमध्ये बदल करण्याबाबतचा विषय चर्चेसाठी घेण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते श्रीमंत ढोले यांनी हा ठराव मांडला, तर सदस्य विक्रम खुटवड यांनी त्यास अनुमोदन दिले. जगदाळे म्हणाले, ‘‘यावर्षीचा प्रारूप आराखडा यापूर्वी प्रशासकीय काळात मंजूर केला होता. मात्र, नियमानुसार त्यास जिल्हा परिषद सभागृहाची मान्यता आवश्यक असल्याने तो मंजुरीसाठी सभेपुढे ठेवण्यात आला.’’ तर या सभेत शिवसेना गटनेत्या सुवर्णा दरेकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते विजयसिंह शिंदे, भाजपचे गटनेते शिवाजी बुचडे, सदस्य शांताराम इंगवले, विष्णू हिंगे, राजेंद्र गावडे, करण खलाटे, स्वाती पाचुंदकर, डॉ. प्राजक्ता दुर्गाडे तसेच बारामती पंचायत समितीचे सभापती किरण तावरे आदींनी चर्चेत सहभाग घेतला.

पंधराव्या वित्त आयोगांतर्गत चार वर्षांचे विकास आराखडे यापूर्वीच मंजूर होऊन केंद्र सरकारच्या ‘ई-ग्राम स्वराज’ प्रणालीवर अपलोड केले आहेत. मात्र, या कालावधीतील काही निधी अद्याप शिल्लक आहे. तसेच, मंजूर केलेल्या अनेक कामांना प्रत्यक्ष सुरुवात झालेली नाही. त्यामुळे सध्याच्या स्थानिक गरजा, कामांची आवश्यकता आणि बदललेले प्राधान्यक्रम लक्षात घेता विकास आराखड्यांमध्ये बदल करणे आवश्यक आहे.
- गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT