Farmer sakal
पुणे

Farmer Loan : पुणे जिल्ह्यातील सव्वादोन लाख शेतकरी लाभार्थी; खरिपासाठी २११० कोटींचे कर्ज

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने (पीडीसीसी) जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदा खरीप हंगामातील पिकांसाठी २ हजार ११० कोटी ७ लाख ५४ हजार रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने (पीडीसीसी) जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदा खरीप हंगामातील पिकांसाठी २ हजार ११० कोटी ७ लाख ५४ हजार रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले.

ही रक्कम गेल्या वर्षाच्या वाटपाच्या तुलनेत यंदा २६६ कोटी १८ लाख ४३ हजार रुपयांनी जास्त आहे. यंदा पीककर्ज वाटपाचे प्रमाण एकूण उद्दिष्टाच्या तुलनेत ११.६४ टक्क्यांनी जास्त आहे. पुणे जिल्ह्यातील दोन लाख ३१ हजार ७४९ शेतकऱ्यांना या पीककर्ज योजनेचा लाभ झाला.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिकांसाठी दरवर्षी एक एप्रिल ते ३० सप्टेंबर या कालावधीत जिल्हा बँक पीककर्ज वाटप करत. या नुसार पीककर्ज वाटपाची मुदत ३० सप्टेंबरला संपली. यंदा वाटपाचे एकूण प्रमाण हे १११.६४ टक्के इतके झाले. गतवर्षी हेच प्रमाण १०२.३४ टक्के इतके होते. पीककर्जवाटपासाठी यंदा एक हजार ८९० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले होते, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा.डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी दिली.

खरीप पीककर्ज दृष्टीक्षेपात

  • १८९० कोटी रुपये - खरिपासाठी कर्ज वाटपाचे एकूण उद्दिष्ट

  • २ हजार ११० कोटी ७ लाख ५४ हजार - प्रत्यक्षात झालेले एकूण पीककर्ज वाटप

  • २ लाख ३१ हजार ७४९ - पीककर्जाचा लाभ मिळालेले शेतकरी

  • १११.६४ टक्के - कर्ज वाटपाचे प्रमाण टक्केवारीत

  • १ हजार ८४३ कोटी ८९ लाख ११ हजार - गतवर्षी झालेले एकूण कर्ज वाटप

  • २६६ कोटी १८ लाख ४३ हजार - गतवर्षीच्या तुलनेत जास्त वाटप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT