Fine Sakal
पुणे

पुणे जिल्ह्यात ‘कोरोना’ नियमांचे उल्लंघन केलेल्यांकडून ४३ कोटींचा दंड वसूल

कोरोना निर्बंधांच्या काळात जिल्ह्यातील सुमारे साडेनऊ लाखांहून अधिक नागरिकांचे प्रशासनाने लागू केलेल्या नियमांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष झाल्याचे समोर आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोना (Corona) निर्बंधांच्या काळात (Restriction Period) जिल्ह्यातील सुमारे साडेनऊ लाखांहून अधिक नागरिकांचे प्रशासनाने लागू केलेल्या नियमांचे (Rules) पालन करण्याकडे दुर्लक्ष झाल्याचे समोर आले आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांकडून तब्बल ४३ कोटी ४८ लाख २ हजार ११३ रुपयांचा दंड वसूल (Fine Recovery) केला आहे. यात सर्वाधिक पुण्यातील ५ लाख ५९ हजार ३६० नागरिकांचा समावेश आहे.

गेल्या सोळा महिन्यांत पोलिस, महापालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायत प्रशासनांनी ही कारवाई केली. कोरोना नियमांकडे दुर्लक्ष केल्याने पुण्यातील साडेपाच लाखांहून अधिक नागरिकांकडून आतापर्यंत सर्वाधिक २७ कोटी ४५ लाख २२ हजार २८० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

शहर व जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी संचारबंदीचा अवलंब करणे, सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर करणे, शाळा, महाविद्यालये, हॉटेल, जीम, सार्वजनिक वाहतूक सेवा बंद ठेवणे आणि अत्यावश्‍यक सेवा वगळता अन्य सर्व दुकाने आणि आस्थापना बंद ठेवणे यासारख्या विविध उपाययोजना केल्या जात आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली. पुणे महापालिकेने शहरातील २७ हजार ७६२ पुणेकरांकडून १ कोटी ३३ लाख ८३ हजार ९३० रुपयांचा, शहर पोलिसांनी ५ लाख ३१ हजार ५९८ नागरिकांकडून २६ कोटी ११ लाख ८८ हजार ३५० रुपयांचा दंड वसूल केला आहे. ग्रामीण भागात ग्रामपंचायतींच्या हद्दीत ग्रामपंचायत आणि पोलिस प्रशासनाने ही दंडात्मक कारवाई केली आहे. जिल्ह्यातील नगरपालिका हद्दीत ग्रामीण पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT