Pune Sowing Sakal
पुणे

Pune Sowing : जिल्ह्यात आजअखेरपर्यंत ७१ हजार ५६५ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण

यंदाच्या खरीप हंगामातील पेरण्यांना आता पुणे जिल्ह्यात गती आली आहे. जिल्ह्यात आजअखेरपर्यंत (ता.१९) ७१ हजार ५६५ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - यंदाच्या खरीप हंगामातील पेरण्यांना आता पुणे जिल्ह्यात गती आली आहे. जिल्ह्यात आजअखेरपर्यंत (ता.१९) ७१ हजार ५६५ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पेरण्यांचे हे प्रमाण ३७ टक्के इतके आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा १२ टक्के पेरण्या कमी झाल्या आहेत. गेल्या वर्षी आजअखेरपर्यंत ९६ हजार ८२३ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. यंदा २५ हजार २५८ हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या कमी झाल्या आहेत.

जिल्ह्यात सर्वाधिक खेड तालुक्यात १९ हजार ६४९ हेक्टर क्षेत्रावर तर, सर्वात कमी हवेली तालुक्यात केवळ ६८३ हेक्टर क्षेत्रावर यंदा खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. गेल्या वर्षी आजअखेरपर्यंत एकूण सरासरी खरीप क्षेत्राच्या ४९ टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या होत्या.

यंदाच्या खरीप हंगामात पाऊस पडण्यास उशीर झाल्याने पेरण्या सुरु होण्यास उशीर झाला आहे. शिवाय पाऊस लांबणीवर पडल्याने जिल्ह्यात अद्यापही भात लावणीसाठी म्हणावी तेवढी गती आलेली नाही. त्यामुळे आतापर्यंत भाताची सुमारे १० हजार हेक्टर क्षेत्रावरच लावणी पूर्ण झाली आहे.

पुणे जिल्ह्याचे खरीप हंगामाचे एकूण सरासरी क्षेत्र हे १ लाख ९५ हजार ७१० हेक्टर इतके आहे. यामध्ये भाताचे एकूण सरासरी क्षेत्र हे सर्वाधिक ५९ हजार ६२७ हेक्टर इतके आहे. यंदाच्या खरीप हंगामात जून महिना हा पूर्ण कोरडा गेला आहे. यामुळे भाताच्या रोपवाटिका टाकण्यास नेहमीपेक्षा उशीर झाला असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी बुधवारी (ता.१९) सांगितले.

आठवड्यांपुर्वीपर्यंत म्हणजेच ४ जुलै अखेरपर्यंत जिल्ह्यात केवळ १० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. मात्र त्यानंतर पाच जुलैपासून पाऊस पडण्यास सुरवात झाली आणि यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. या पावसामुळेच खरीप पेरण्यांना गती आली आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात भात, खरीप ज्वारी, बाजरी, रागी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, तीळ, कारळे, सूर्यफूल, सोयाबीन आदी प्रमुख पिके घेतली जातात.

खरिपाचे सरासरी व पेरणी झालेले क्षेत्र (हेक्टरमध्ये)

- तालुका --- सरासरी क्षेत्र --- पेरणी पूर्ण झालेले क्षेत्र

- हवेली --- ४९०६ --- ६८३

- मुळशी --- ८५४५ --- ८९३

- भोर --- १७४६५ --- ४६५९

- मावळ --- १२९९० --- ४११२

- वेल्हे --- ५८९२ --- १५५८

- जुन्नर --- २९७७७ --- १४६९२

- खेड --- २३३९९ --- १९६४९

- आंबेगाव --- १६०१४ --- ७४३५

- शिरूर --- ३३७०० --- ९०१०

- बारामती --- ११००१ --- १७५५

- इंदापूर --- ८४१४ --- २६०५

- दौंड --- ४३८८ --- १६६३

- पुरंदर --- १९२१९ --- २८५१

- एकूण --- १, ९५, ७१० --- ७१५६५

पुणे जिल्ह्यात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पाऊस सुरु झाला आहे. यामुळे जिल्हात खरीपाच्या पेरण्यांना वेग आला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण सरासरी खरीप क्षेत्राच्या ३७ टक्के क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक पेरण्या या सोयाबीनच्या झाल्या आहेत. भात लावणीने आता वेग घेण्यास सुरवात केली आहे. खरीप पेरण्यांसाठी बियाणे आणि रासायनिक खते पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत.

- संजय काचोळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT