जिल्हा दूध संघ sakal
पुणे

जिल्हा दूध संघाचा ठराव बेकायदा : चांभारे

पंचवार्षिक निवडणुकीत मतदानाचा अधिकार नाकारण्याबाबत केलेला ठराव हा बेकायदा असल्याचा आरोप माजी संचालक अरुण चांभारे यांनी केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (कात्रज डेअरी) अक्रियाशील सभासदांना येत्या पंचवार्षिक निवडणुकीत मतदानाचा अधिकार नाकारण्याबाबत केलेला ठराव हा बेकायदा असल्याचा आरोप माजी संचालक अरुण चांभारे यांनी केला आहे. या ठरावाच्या माध्यमातून थेट सरकारने याबाबत केलेल्या अधिनियमालाच आव्हान दिल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात कोरोना संसर्ग आणि त्याआधी उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे राज्य सरकारने सहकारी संस्थांच्या पंचवार्षिक निवडणुकीत सरसकट सर्व सभासदांना मतदानाचा अधिकार दिला आहे. यासाठी सहकारी संस्थांच्या अधिनियमात दुरुस्ती केली आहे. या अधिनियमाला महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) अधिनियम-२०२१ असे नाव दिले आहे. याबाबतचे राजपत्र १६ जुलै रोजी प्रसिद्ध झाले आहे. तरीही त्याकडे सरळ दुर्लक्ष करत कात्रज डेअरीने जाणीवपूर्वक अक्रियाशील सभासदांना मतदानास मज्जाव करणारा ठराव मंजूर केला आहे. कात्रज डेअरीची वार्षिक सभा नुकतीच झाली. यात अक्रियाशील सभासदांना दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत मतदानास मज्जाव करणारा ठराव मंजूर केला. याबाबतचे वृत्त ‘सकाळ’ने मंगळवारी प्रसिद्ध केले होते. ही बातमी वाचल्यानंतर त्यांनी दुग्धविकास विभागाशी संपर्क साधला आणि त्यांना या राजपत्राबाबतची माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यातील बुधवार पेठेत सपना बिल्डिंगमध्ये पोलिसांचा छापा... समोर जे दिसलं ते धक्कादायक, २ जणांना अटक

UP तील महिलांना मिळणार ५० हजारांची मदत? निवडणुकीपूर्वी २० हजारांचा हप्ता देण्याचा प्रस्ताव

Gold Rate Today: सोन्याच्या भावात घसरण! स्वातंत्र्यदिनाआधी सलग दुसऱ्या दिवशी सोनं स्वस्त; पाहा ताजा भाव

Marathi News Live Updates : पुणे जिल्ह्यात ८३,००० शेतकऱ्यांनी काढला पीक विमा; २३८ कोटी रुपयांचे मिळणार पीक विमा सुरक्षा कवच

Hardik Pandya Trade : 'तो मला संघासोबत नको, तर मी येतो...'! हार्दिकचा राग, कोलकाता नाइट रायडर्ससमोर अट अन् वाढली कटकट

SCROLL FOR NEXT