mask 
पुणे

पुण्यात मास्कची शिस्त मोडणाऱ्या नागरिकांकडून तब्बल २८ कोटींचा दंड वसूल

गजेंद्र बडे

पुणे : कोरोनाचा संसर्ग रोखायचा असेल तर, प्रत्येक नागरिकाने मास्कचा वापर करण्याची शिस्त पाळलीच, असे वारंवार बजावूनही पुणेकर आणि जिल्ह्यातील नागरिक या शिस्तीचे पालन करत नसल्याचे सातत्याने निदर्शनास आले आहे. अशा बेशिस्त नागरिकांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाईचा बडगा उभारण्यात येत आहे. यानुसार गेल्या वर्षभरात आज अखेरपर्यंत जिल्ह्यातील ६ लाख २१ हजार ३१९ व्यक्तींकडून तब्बल २८ कोटी ११ लाख ९१ हजार १३० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दंडात्मक कारवाई करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये पुणे शहरातील २ लाख ८० हजार ८१४ नागरिक आहेत. या सुमारे पावणेतीन पुणेकरांकडून १७ कोटी ९९ लाख ४० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

राज्यातील पहिला कोरोना रुग्ण ९ मार्च २०२० ला पुणे शहरात सापडला. कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे याचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने मास्कचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार महापालिका, जिल्हा परिषद आणि पोलिस प्रशासनाकडून मास्कच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्याकडून कारवाई करण्यात येत आहे. 

क्षेत्रनिहाय कारवाई व दंड 

क्षेत्र --- दंड झालेल्या व्यक्ती --- दंडाची वसूल रक्कम(रुपयांत) 

- पुणे शहर ---- २ लाख ८० हजार ८१४ ---- १७ कोटी ९९ लाख ४० हजार ५३०.

- पिंपरी चिंचवड शहर ---- ७१ हजार १३३ ---- ३ कोटी ८७ लाख ५००.

- ग्रामीण भाग ---- २ लाख ६९ हजार ३७२ ---- ६ कोटी २५ लाख ५० हजार १००.

- एकूण पुणे जिल्हा ----- ६ लाख २१ हजार ३१९ ----- २८ कोटी ११ लाख ९१ हजार १३०.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Fraud : अशोक खरात की लक्ष्मण? नाशिकच्या भोंदूबाबाचा खरा चेहरा समोर; दहावी मार्कशीटमधील 'या' आकड्यांनी उडाली खळबळ, कसं बदललं नाव?

Gold Rate Today: एकाच दिवसात सोन्याच्या भावात मोठा बदल! महाराष्ट्रात आजचा ताजा भाव किती?

Hingoli News: तेलाचे दर १५ रुपयांनी वाढले; अमेरिका-इराण युद्धाची झळ आली स्वयंपाकघरापर्यंत

बापरे! शिवानी रांगोळेला नक्की काय झालं? हातात वॉकर घेतलेला फोटो शेअर करत अभिनेत्री म्हणाली...

बापरे! लोकप्रिय अभिनेत्रीचा भीषण अपघातात मृत्यू, वयाच्या ३० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT