little school Sakal
पुणे

पुणे : कॉलेजपाठोपाठ आता पूर्व प्राथमिक शाळासुद्धा गजबजणार

पालकमंत्री अजित पवार यांनी पूर्व प्राथमिक शाळा सुरू करण्याचा आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे शहर व जिल्ह्यातील कोरोना संसर्ग नियंत्रणात येत असल्याने आता पूर्व प्राथमिक शाळाही पूर्ववत सुरु करण्याचा निर्णय शनिवारी (ता.२६) झालेल्या जिल्हास्तरीय कोरोना आढावा बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार पालकमंत्री अजित पवार यांनी पूर्व प्राथमिक शाळा सुरू करण्याचा आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिला आहे. या आदेशामुळे मागील दोन वर्षांपासून बंद असलेले प्ले ग्रुप, नर्सरी, लहान गट आणि छोटा गटाचे वर्ग होणार असून, यामुळे तीन ते सहा वर्षे वयोगटातील मुलेही आता शाळेत जाऊ शकणार आहेत. यामुळे शाळा-महाविद्यालयांच्या पाठोपाठ आता पूर्व प्राथमिक शाळासुद्धा बाल-गोपाळांनी गजबजणार आहेत.

पालकमंत्री पवार यांच्या या आदेशानंतर येत्या मंगळवारपासून (ता. १ मार्च) शहरातील सर्व पूर्व प्राथमिक शाळा सुरु करण्याचा आणि उद्यानांच्या वेळा वाढविण्याचा आदेश पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी शनिवारी संध्याकाळी दिला आहे. विक्रम कुमार यांच्या या आदेशामुळे उद्याने आता सकाळी सहा ते दहा आणि सायंकाळी ४ ते आठ वाजेपर्यंत चालू राहणार आहेत.

जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा पवार यांनी शनिवारी एका बैठकीत घेतला. या बैठकीत बोलताना त्यांनी पूर्व प्राथमिक शाळा सुरु करण्याचा आदेश दिला आहे. दरम्यान, याबाबतचे ‘पूर्वप्राथमिक’चा निर्णय अधांतरीच या शीर्षकाखालील वृत्त सकाळने १४ फेब्रुवारीला प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत, पालकमंत्री पवार यांनी हा निर्णय घेतला आहे. या बैठकीला पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आमदार दिलीप मोहिते, चेतन तुपे, सुनील टिंगरे, सिद्धार्थ शिरोळे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील, पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, सह पोलिस आयुक्त डॉ.रवींद्र शिसवे, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख आदी उपस्थित होते.

या आढावा बैठकीत विभागीय आयुक्त राव यांनी सादरीकरणाद्वारे पुणे जिल्ह्यातील कोरोना संसर्गाच्या परिस्थितीची माहिती दिली. जिल्ह्यात गेल्या सात दिवसात नवीन रुग्णांच्या संख्या पूर्वीच्या आठवड्यातील रुग्णांच्या तुलनेत ५१ टक्क्यांनी कमी झाली आहे. शिवाय मागील आठवड्याच्या तुलनेत १८ वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणात ८५ लाखांनी तर, १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणात ४९ हजारांनी वाढ झाली. पुणे जिल्ह्याने आतापर्यंत दोन्ही डोस मिळून १ कोटी ७२ लाख लसीकरणाचा लसीकरणाचा टप्पा ओलांडला आहे. ६० वर्षावरील सहव्याधी असलेल्या ५८ टक्के व्यक्तींना लशीची वर्धक मात्रा देण्यात आल्याचे राव यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील पहिला कोरोना रुग्ण ९ मार्च २०२० ला पुणे शहरात सापडला होता. तेव्हापासून हळूहळू कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने केंद्र सरकारने २४ मार्चपासून लॉकडाऊन लागू केले होते. तेव्हापासून आजअखेरपर्यंत पूर्व प्राथमिक शाळा पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे पवार यांच्या आदेशामुळे आता तब्बल दोन वर्षांच्या खंडानंतर या शाळा सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

उद्यापासून जम्बो कोविड रुग्णालये बंद होणार

पुणे शहर व जिल्ह्यातील कोरोना संसर्ग आटोक्यात आल्याने आता कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी जम्बो कोविड रुग्णालये चालू ठेवण्याची आवश्‍यकता नाही. त्यामुळे येत्या सोमवारपासून (ता. २८) जम्बो कोविड रुग्णालये बंद करावीत आणि रुग्णालये बंद केल्यानंतर तेथील परिसर पूर्ववत करण्यात यावा. या रुग्णालयांतील साहित्य हे पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि ग्रामीण क्षेत्रात उपयोगात आणले जावे. कोरोना संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत केंद्र सरकारच्या सूचनेनुसार नागरिकांनी मास्कचा वापर करावा आणि उद्याने व दुकानांच्या वेळा पूर्वीप्रमाणे करण्यात याव्यात, असाही आदेश पालकमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray targets Mumbai Mayor : बांगलादेशी घुसखोरांवरून आदित्य ठाकरेंचा मुंबईच्या महापौरांना टोला अन् भाजपला सवाल, म्हणाले...

Valentine Day 2026 Marathi Wishes: 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त तुमच्या प्रेमळ व्यक्तीला पाठवा हृदयस्पर्शी शुभेच्छा, प्रेमाचा दिवस बनेल स्पेशल

Indian Passport Ranking : भारतीय 'पासपोर्ट रँकिंग'मध्ये मोठी सुधारणा!, आता ५६ देशांमध्ये 'Visa-Free' एन्ट्री करता येणार

USA vs NED : अमेरिकेच्या विजयात पुणे, मुंबईचे खेळाडू चमकले; नेदरलँड्सचा पराभव पाकिस्तानच्या पथ्यावर, अ गटाचे चित्र स्पष्ट

अभ्यास करा..! पाचवी अन्‌ आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा २२ फेब्रुवारीला; परीक्षेत दोन पेपर, १५० गुणांचा वस्तुनिष्ठ प्रश्न, वाचा...

SCROLL FOR NEXT