पुणे

झेडपीकडून शिष्यवृत्तीसाठी ८४ लाख

CD

पुणे, ता. २६ : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी प्रोत्साहन देत त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला चालना देण्यासाठी जिल्हा परिषदेने ८४ लाख रुपयांची तरतूद केली आहे. त्याला स्थायी समितीने मान्यता दिली. शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, सराव परीक्षा, प्रश्नसंच आणि आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यावर या निधीतून भर दिला जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पुणे जिल्हा परिषदेकडून गेल्या काही वर्षांपासून जिल्हा परिषद शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यंदाच्या शैक्षणिक उपक्रमांमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक सुविधा मिळाव्यात, तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना अधिक चांगली संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने ही तरतूद करण्यात आली आहे.
या निधीपैकी ४० लाख रुपये इयत्ता चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षा शुल्कासाठी खर्च केले जाणार आहेत. उर्वरित निधीतून विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा, प्रश्नसंच, मार्गदर्शन आणि अन्य शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पातळीवरच अधिक चांगले मार्गदर्शन मिळण्यास मदत होणार आहे. २०२६मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत पुणे जिल्हा अग्रभागी राहिला होता. या यशामुळे शिष्यवृत्ती परीक्षेतील पुणे जिल्हा परिषदेच्या कामगिरीला अधिक बळ मिळाले आहे. आगामी काळातही हे यश कायम ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या तयारीवर अधिक लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

एक झाड लावणार...
जलसंधारण सप्ताहानिमित्त पुणे जिल्हा परिषदेकडून यंदा ‘एक झाड’ अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानातून अंगणवाडी व शाळांच्या माध्यमातून पाणी बचत आणि जलसंधारणाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविला जाणार आहे. विविध उपक्रमांद्वारे जनजागृती केली जाणार असून, नागरिकांनी आपल्या कुटुंबाच्या नावाने एक झाड लावावे, असा संदेशही दिला जाणार आहे. आगामी काळातील पाणीटंचाई लक्षात घेता जलसंधारणासाठी नागरिकांचा सहभाग वाढविण्यावर भर दिला जाणार असल्याचे जगदाळे यांनी सांगितले.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT