प्रभात रोड ः सिंबायोसिस स्पोर्ट्स सेंटरच्या टेबल टेनिस हॉलमध्ये सुरू असलेल्या पुणे जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत आहाना गोडबोले सुरेख फटका मारताना.
गोडबोले, इंगवलेचे मानांकितावर विजय
पुणे जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धा
पुणे, ता. २७ ः सिंबायोसिस स्पोर्ट्स सेंटर यांच्या वतीने आयोजित चौथ्या पुणे जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत आहाना गोडबोले, तनय इंगवलेने मानांकित खेळाडूंवर विजय मिळविताना आपली आगेकूच कायम राखली आहे.
पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने प्रभात रोड येथील सिंबायोसिस स्पोर्ट्स सेंटरच्या टेबल टेनिस हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत पंधरा वर्षांखालील मुलांच्या गटात बिगर मानांकित तनय इंगवलेने दुसऱ्या मानांकित पुष्कर चक्रदेवचा ११-७, ११-५, १०-१२, ११-८ असा, अव्वल मानांकित आर्यन वानखेडेने साहिल भोरकरचा ११-४, ११-७, ११-३ असा, आणि चौथ्या मानांकित नभ पांचोलियाने मिथिल ठक्करचा ११-६, ११-८, ११-६ असा पराभव केला होता.
मुलींच्या गटात सहाव्या मानांकित आहाना गोडबोलेने तिसऱ्या मानांकित शरण्या पटवर्धनचा ११-५, १२-१०, ६-११, ११-७ असा, अव्वल मानांकित दिया शिंदेने डायना पटेलचा ११-६, ११-६, ११-६ असा तर चौथ्या मानांकित अनन्या पाटीलने पाचव्या मानांकित स्पृहा गुजरचा ११-३, ११-५, ८-११, ९-११, ११-७ असा आणि दुसऱ्या मानांकित नीरजा देशमुखने श्रेया कोठारीचा ११-५, ४-११, ११-३, ११-८ असा पराभव केला होता.
निकाल :
पंधरा वर्षांखालील मुले : उप उपांत्यपूर्व फेरी : एल्विस टॉम वि.वि. अंगद भार्गवे १२-१०, ११-९, ११-५; वरदान कोलते वि.वि. साद वकील ११-७, ११-९, ११-५; ऋग्वेद दांडेकर वि.वि. सर्वेश जोशी ८-११, ६-११, १२-१०, ११-८, ११-६; नीरज नांदेडे वि.वि. आदम रामपूरवाला ११-८, १५-१३, ११-७; वरद माळवदकर वि.वि. ओंकार अभ्यंकर ९-११, ११-८, ११-६, ११-६; तनय इंगवले वि.वि. पुष्कर चक्रदेव ११-७, ११-५, १०-१२, ११-८.
---------------------